Tiger 3 Release Date : टायगर-३ ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार, व्हिडीओ पोस्ट करत सलमान खानने जाहीर केली तारीख

टायगर-३ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार

actor-salman-khan- Katrina-kaif-shared-video-of-his-next-film-tiger-3-will-release-on-next-year-21-april-news-update-today
actor-salman-khan- Katrina-kaif-shared-video-of-his-next-film-tiger-3-will-release-on-next-year-21-april-news-update-today

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina kaif) या जोडीला चांगलीच पसंदी मिळते. सलमान-कतरिना जोडीच्या एक था टायगर, टायगर जिंदा है या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. दरम्यान, या जोडीचा टायगर-३ (Tiger 3) हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. आज स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून सलनाम खानने एक व्हिडीओ शेअर करत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

सलमान खान आणि कतरिना यांच्या या चित्रपटाची घोषणा जुन महिन्यातच करण्यात आली होती. हा चित्रपट पुढील वर्षी २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त साधून सलमान खानने एक व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांना या चित्रपटाबद्दल अधिका माहिती दिली आहे. यामध्ये त्याने हा चित्रपट हिंदी, तमीळ, तेलुगु या भाषांत प्रदर्शित केला जाईल, असे सांगितले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताच सलमान खानच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, अशा आशयाच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

जुन महिन्यात यशराज फिल्म्सने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये कतरिना अँग्री गर्लच्या रुपात दिसत होती. राग, घामाने भिजलेलं अंग, मोकळे केस अशा ढंगात कतरिनाला दाखवण्यात आले होते. याच कारणामुळे टायगर-३ चित्रपटाचे कथानक काय असेल. यामध्ये कतरिनाची काय भूमिका असेल, असा प्रश्न पडलेला असताना सलमानने आणखी एक व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.

टायगर-३ हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार

टायगर-३ हा चित्रपट हिंदीसह तमिळ, तेलुगू या भाषांत प्रदर्शित केला जाणार असून यामध्ये सलमान-कतरिना यांच्याव्यतिरिक्त इमरान हाशमी हा दिग्गज अभिनेतादेखील झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबतची सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here