भारती सिंह सध्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसत आहे. मात्र भारती चक्क ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यावर मलायका अरोरा सोबत थिरकली आहे. डान्स व्हिडीओ चांगलाच व्हायर होत आहे.
‘दबंग’ चित्रपटातलं ‘मुन्नी बदनाम हुई’ हे गाणं तरुणाईसाठी नवीन नाही. या गाण्यात अभिनेत्री मलायका अरोरा डान्स करताना दिसून आली होती.
सध्या मलायका इंडियाज बेस्ट डान्सर या कार्यक्रमात परिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. त्यामुळे याच शोच्या मंचावर ‘मुन्नी बदनाम हुई’ हे गाणं लावण्यात आल्याचं पाहायला मिळालं.
वाचा l VIDEO आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला,उध्दव ठाकरेंचा फडणवीसांना दणका
विशेष म्हणजे हे गाणं लागताच क्षणी मलायकासोबत भारती सिंहनेदेखील ठेका धरला. दरम्यान, मलायका अरोरा आणि भारतीच्या डान्सचा व्हिडीओ एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे.
मात्र, या व्हिडीओमध्ये मलायका अरोरा पेक्षा भारतीच्याच डान्सची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.विनोदाचं अचूक टाइमिंग साधत प्रेक्षकांना खळखळून हसवणारी भारती सिंह साऱ्यांनाच ठावूक आहे.
उत्तम विनोदांसोबतच भारती तिच्या खास शैलीतील सूत्रसंचालनासाठीदेखील ओळखली जाते. सध्या भारतीचा व्हिडीओ चांगलाच व्हायर होत आहे.