मुखवटे कितीही बदलले व अवडंबर केले तरी सत्य कसे लपणार?

मोदींच्या मंत्रिमंडळ फेरबदलावरून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस,प्रवक्ते सचिन सावंतांची टीका

Sachin Sawant critize When will the Prime Minister who asked the people to give up gas subsidy ask the BJP leaders to give up the subsidy
Sachin Sawant critize When will the Prime Minister who asked the people to give up gas subsidy ask the BJP leaders to give up the subsidy

मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेनं राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात गाठीभेटी सुरू होत्या. अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस,प्रवक्ते सचिन सावंत Sachin Sawant यांनी मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आपल्या अभूतपूर्व अपयशाचे खापर फोडण्यासाठी काही अजून डोकी सामिल करत आहेत. डळमळीत अर्थव्यवस्था,आकाशाला भिडणारी महागाई, अपमानित होत असलेल्या महिला, बेरोजगारीने लाचार तरुण, आक्रोश करणारे शेतकरी, सीमेवर संकट झेलणारे सैनिक, दहशतवादाचे काश्मीरमध्ये वाढते संकट आहे.

कोरोनाची तिसरी लाट आणि भयानक हाहाकाराचे सावट असे अनेक मुद्दे देशासमोर आहेत.असे असताना मंत्रीमंडळ विस्तार हा विषय निरर्थक यासाठी आहे की मुखवटे कितीही बदलले व अवडंबर केले तरी सत्य कसे लपणार?सत्य हेच आहे की हे सरकार केवळ दीड माणसं चालवत आहेत. एक मोदी आणि अर्धे अमित शाह!

बाकी केवळ संगीत खुर्ची! या मंत्र्यांना नाहीतरी ट्रोलींग शिवाय अधिक काम असणार नाही. त्यामुळे एक खुर्ची आणि अर्ध्या स्टूलवर बसलेल्या मोदी व शाहना आम्ही प्रश्न विचारत राहू.

त्यांना आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी बोलायला, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरूध्द लढण्याचे नियोजन करण्यास वेळ नाही.

सर्वपक्षीय बैठक बोलावयाला वेळ नाही. पण दलबदलू व सत्तेसाठी हपापलेल्यांसाठी मंत्रीमंडळ विस्ताराचा खेळ अशा संकटकाळी मांडायला वेळ आहे हे स्पष्ट दिसून येते. हाच मोदी सरकारचा खरा चेहरा आहे. मोदी सरकारच्या सत्तेच्या खेळाशी जीवनमरणाचा संघर्ष करणाऱ्या सामान्य माणसाचे कोणतेही घेणंदेणं नाही.

हेही वाचा 

…मग वर्षभरापासून राज्यपालांनी 12 आमदारांची दाबलेली यादी लोकशाहीची हत्या नाही का?

Dilip Kumar l ट्रॅजिडी किंग दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

  Dilip Kumar Death: बॉलीवुड के दिग्गज एक्टर दिलीप कुमार का निधन, 98 साल में दुनिया को कहा अलविदा

Eknath khadse l एकनाथ खडसेंना ईडीकडून मोठा धक्का; जमीन घोटाळा प्रकरणी जावयाला अटक

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here