Siddhivinayak Temple l सिद्धिविनायक मंदिरात एका तासात १०० भाविकांनाच प्रवेश

पहाटे 4 वाजेपासून भक्तांची मंदिराबाहेर गर्दी

Only 100 devotees enter Siddhivinayak temple in one hour
Only 100 devotees enter Siddhivinayak temple in one hour

मुंबई l मुंबईसह महाराष्ट्रात सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे आज सोमवार १६ नोव्हेंबरपासून उघडण्यात आली आहेत.  मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या Siddhivinayak Temple व्यवस्थापनाने भाविकांसाठी स्वतःचा प्रोटोकॉल जाहीर केला आहे. मंदिरात एका तासात जास्तीत जास्त १०० भाविकांनाच प्रवेश दिला जात आहे.

कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सिद्धिविनायक मंदिराच्या व्यवस्थापनाने भाविकांसाठी स्वतःचा प्रोटोकॉल निश्चित केला आहे, अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांनी दिली.

प्रोटोकॉलनुसार आजारी नसलेल्या अशा ६५ पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनाच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश मिळणार आहे. दररोज फक्त एक हजार भाविकांनाच सिद्धिविनायकाचे दर्शन घेता येणार आहे. मंदिरात एका तासात जास्तीत जास्त १०० भाविकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

ह्या नियमांचे पालन बंधनकारक

मंदिरात प्रवेश करण्यासाठी मास्क घालण्याचे आणि सोशल डिस्टंस पाळण्याचे बंधन असेल. प्रवेशद्वारावर मास्क व्यवस्थित घातल्याची खात्री केल्यानंतर सुरक्षा रक्षक शरीराचे तापमान तसेच रक्तातील ऑक्सिजनची पातळी तपासतील.

हेही वाचा l Spring Onion l कांद्याच्या पातीचे गुणकारी फायदे

प्रवेश देण्याचा निर्णय झाल्यास यंत्राच्या मदतीने अंगझडती आणि सोबतच्या सामानाचे स्कॅनिंग होणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मंदिर परिसरातील भाविकांच्या हालचालींवर सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवेल. मंदिर परिसरात मास्क काढण्यास मनाई असेल.

सिद्धिविनायक व्यवस्थापनाने स्वतःचे अॅप केले तयार

सिद्धिविनायक व्यवस्थापनाने स्वतःचे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या मदतीने दर्शनासाठी विशिष्ट वेळेचे बुकिंग आधीच करत येईल. ज्यांच्याकडे अॅप नाही अशांना मंदिराच्या प्रवेशद्वारावर क्यू आर कोड आधारित पास घेऊन मंदिरात प्रवेश करावा लागेल.

हेही वाचा l Curry Leaves l कढीपत्त्याची पानं खाण्याचे ‘हे’ १० गुणकारी फायदे

ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केले आहे अशांना मोबाइलमध्ये आलेला क्यू आर कोड मंदिरात प्रवेश करताना दाखवावा लागणार आहे. क्यू आर कोड मिळाला तरी सुरक्षा रक्षकांकडून आरोग्य तपासणी केली जाईल. सुरक्षा रक्षकांकडून परवानगी मिळाल्यानंतरच मंदिरात प्रवेश करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here