नवी दिल्ली: कॉंग्रेसमध्ये असताना ज्या लोकांना भाजपाची भीती वाटते, त्यांची पक्षात काहीच गरज नाही. अशा लोकांना पक्ष सोडण्यास सांगितले पाहिजे, असा इशारा काँग्रेसचे खासदार राहुल गांधी Rahul Gandhi यांनी दिला. आरएसएसच्या RSS विचारधारेवर विश्वास ठेवणारी माणसे आम्हाला नको आहेत. कॉंग्रेसबाहेरील जे लोक निर्भय आहेत त्यांना पक्षात आणले पाहिजे. पक्षाची सोशल मीडिया विभागाची बैठक पार पडली यावेळी राहुल गांधी बोलत होते.
शुक्रवारी नागालँड कॉंग्रेसचे खासदार उत्तम कुमार रेड्डी यांनी राहुल गांधींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओमध्ये राहुल सांगत आहेत, ‘बरेच लोक घाबरले नाहीत, जे कॉंग्रेसबाहेरील आहेत, ते सर्व आपले आहेत. त्यांना पक्षात आणा आणि भीती वाटणाऱ्यांना बाहेर काढा. चला भैय्या निघा, आपण आरएसएसचे आहात, चला. असे लोक नको, आपली गरज नाही. आम्हाला निर्भय माणसांची गरज आहे. ही आमची विचारधारा आहे. हा माझा मूलभूत संदेश आहे.
There’re many fearless people, who are not in Congress. They should be brought in & the Congressmen who are afraid of (BJP) should be shown exit door. We don’t need those who believe in RSS ideology. We need fearless people: Congress leader Rahul Gandhi at party’s SM Dept meet pic.twitter.com/rtHT5WQWFM
— ANI (@ANI) July 16, 2021
महात्मा गांधींचा कोट शेअर केला
राहुल यांचा व्हिडिओ शेअर करताना रेड्डी यांनी लिहिले की ते महात्मा गांधींच्या पावलावर पाऊल ठेवण्याचे उदाहरण आहे. भाजप-आरएसएसच्या द्वेषाच्या अजेंडाला दिलेले हे उत्तर आहे. त्यांनी गांधीजींचा कोट देखील शेअर केला, ज्यात ते म्हणाले की आपला शत्रू हा द्वेष आहे, पण आपला खरा शत्रू हे भय आहे.
हेही वाचा
अनिल देशमुखांच्या मालमत्ता जप्तीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचा ईडीला सवाल