औरंगाबाद – संभाजीनगर वाद l नाना पटोलेंच्या बैठकीकडे औरंगाबादचे पदाधिकारी फिरकलेच नाही!

मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये संताप,काँग्रेसने नामांतराला पाठिंबा दिल्याने शेकडो पदाधिका-यांचे राजीनामे

state-president-the-congress-office-bearers-turned-their-backs-on-the-meeting-office-bearers-absent-from-mumbai-meeting-aurangabad-sambhajinagar-issue-news-update-today
state-president-the-congress-office-bearers-turned-their-backs-on-the-meeting-office-bearers-absent-from-mumbai-meeting-aurangabad-sambhajinagar-issue-news-update-today

मुंबई:  तत्कालीन महाविकास आघाडी (MVA) सरकारने औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नांमतरण ‘संभाजीनगर’ करण्याचा प्रस्ताव नुकताच मंजुर केला. काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) या प्रस्तावाला सहमती दर्शवली होती. त्यामुळे औरंगाबादसह राज्यातील मुस्लिम कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. जवळपास तीनशेपेक्षा पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेल्या पदाधिका-यांशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवार (3 जूलै) मुंबईत संध्याकाळी टिळक भवनात (Tilak Bhavan) बैठक बोलावली होती. मात्र सर्व पदाधिकाऱ्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. यामुळे काँग्रेसला औरंगाबादसह राज्यात मोठा धक्का बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेसचे शहराध्यक्ष हिशाम उस्मानीसह जवळपास 300 पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षश्रेष्ठींकडे पाठविले आहे. नाराज कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार यांनी 30 जूनरोजी एक पत्र जिल्हा प्रभारी मुजाहिद खान यांना पाठविले होते. त्या पत्रामध्ये नमूद कऱण्यात आले होते की, काँग्रेस पदाधिका-यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहे. याची माहिती प्रदेश कार्यालयाला मिळाली आहे. काँग्रेस पक्षाच्या हिताकरीता पदाधिकारी पक्षात राहणे गरजेचे आहे. जिल्हा प्रभारी या नात्याने औरंगाबाद येथे जावून पदाधिका-यांशी चर्चा करावी. त्यांना प्रत्यक्ष भेटून सर्व अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवावा. असे पत्रात नमूद करण्यात आले होते.

मात्र, काँग्रेसचे पदाधिकारी पक्षावर नाराज असून आज मुंबईत बैठकीकडे पाठ फिरवली. आम्ही बैठकीला जाणार नाही. आम्हाला गरज नाही. शहराचे नाव बदलले हे आम्हाला मान्य नाही. आम्ही राजीनामे पाठविलेले आहे. असे पदाधिका-यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसीच भूमिका धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत कॉंग्रेसने याला विरोध करायला हवा होता अशी मुस्लीम पदाधिकाऱ्यामध्ये भावना आहे. त्यामुळे नाराज पदाधिकारी विरुध्द पक्षश्रेष्ठी असा सामना रंगण्याची चिन्हे आहे.

काय आहे काँग्रेसच्या पत्रात…

 

———————– 

शहराध्यक्षपदासाठी इब्राहीम पठाण, युसुफ मुकाती मुंबईला…

पाच मुस्लिम कार्यकर्त्यांचा शहराध्यक्ष पदावर डोळा असून ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत. मात्र त्या कार्यकर्त्यांविरुध्द काँग्रेसमध्ये चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. माजी शहराध्यक्ष इब्राहीम पठाण, युसुफ मुकाती, गुलाब पटेल, युसुफ खान (वाय.के.बिल्डर) हे मुंबईमध्ये गेलेले आहेत. ते शहराध्यक्ष पदासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात रंगली आहे. मात्र हे कार्यकर्त्यांविरुध्द संताप व्यक्त केला जात आहे.

—————————  

या पदाधिका-यांनी दिले राजीनामे…

हिशाम उस्मानी (शहराध्यक्ष काँग्रेस), हमद चाऊस (अध्यक्ष अल्पसंख्याक मराठवाडा विभाग), मझर पटेल (जिल्हा अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग), शेख अथर (शहर अध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग), सय्यद हमीद (शहागंज ब्लॉक अध्यक्ष), आमेर अब्दुल सलीम (प्रदेश महासचिव, युवक कांग्रेस), इद्रीस नवाब खान, (प्रदेश सचिव, युवक कॉंग्रेस), मुजफ्फरखान पठाण, (सचिव, शहर काँग्रेस), अखिल पटेल (सदस्य, औरंगाबाद शहर काँग्रेस), मसरूर सोहेल खान (सदस्य, शहर काँग्रेस), मोईन ईनामदार (सदस्य, शहर कांग्रेस), हाजी मोईन कुरैशी (शहर कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग), इरफ़ान गुलाब खान (शहर उपाध्यक्ष, युवक कांग्रेस), लियाक़त पठाण ( सदस्य, शहर कांग्रेस), शेख शफीक सरकार (महासचिव, शहर युवक काँग्रेस), शोएब अब्दुल्ला शेख (महासचिव, शहर युवक काँग्रेस), इंजिनिअर मोहसीन खान (महासचिव शहर दु युवक काँग्रेस), अनीस पटेल (प्रदेश महासचिव, किसान खेत मजदूर काँग्रेस), शेख सगीर अहेमद (विधानसभा सचिव, युवक काँग्रेस), शेख फैज़ (विधानसभा अध्यक्ष, युवक काँग्रेस)माजी नगरसेवक इब्राहीम पटेल. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here