तैवान : तैवानमध्ये गेल्या २४ तासात तीन भूकंपाचे धक्के बसले आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैवानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंटी भूकंपाचं मुख्य केंद्र आहे, शनिवारी याच भागात ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. यानंतर रविवारी दुपारी ७.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला आहे.
भूकंपामुळे तैवानमधील अनेक रस्त्यांना तडे गेले आहेत, पूल कोसळले आहेत. युली येथे एक दुकान पडलं असून, चार लोक खाली दबले आहेत. त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पूल कोसळले असल्याने काही वाहनंदेखील खाली कोसळल्याची माहिती मिळत आहे. डोंगली स्थानरावर ट्रेन रुळावरुन खाली उतरली, स्थानकाचं छतही कोसळलं आहे. युएस पॅसिफिर त्सुनामी वॉर्निग सेंटरने, या भूकंपानंतर तैवानामध्ये त्सुनामी अलर्ट जारी केला आहे.
युएस पॅसिफिक त्सुनामी वॉर्निग सेंटरने, या भूकंपानंतर तैवानामध्ये त्सुनामी अलर्ट जारी केला आहे.
A bridge collapsed in #Taiwan after an #earthquake.pic.twitter.com/dSZKVAtOi3
— CN Wire (@Sino_Market) September 18, 2022
दुसरीकडे, जपानमध्येही ३.२ फूट उंच लाटांचा त्सुनामी अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओकिनावा येथेही भूकंप आला असल्याने हा अलर्ट देण्यात आला आहे.
संपूर्ण तैवानमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले असून राजधानीत मोठं नुकसान झालं आहे. काही इमारतींना तडे गेले आहेत. ताइनान आणि काओसंग या ठिकाणी भूकंपाचा जास्त प्रभाव दिसल नाही.
An earthquake of magnitude 7.2 hit off the coast of Taiwan#Taiwan #earthquake #台湾地震 #臺灣 #地震 #台湾 pic.twitter.com/XS0p2iES4z
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) September 18, 2022
तैवान रिंग ऑफ फायर परिसरात येतो. भौगिलक कारणामुळे येथे सर्वाधिक भूकंप, त्सुनामी येतात. तसंच ज्वालामुखीचे स्फोट होत असतात. तैवानमध्ये २०१६ मध्ये आलेल्या भूकंपात १०० लोकांचा मृत्यू झाला होता. १९९९ मध्ये आलेल्या ७.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपात २००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.