T20 WC, NZ Vs PAK: पाकिस्तानचा न्यूझीलंडवर ५ विकेट्सनं विजय

टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताविरुद्ध संस्मरणीय विजय नोंदवल्यानंतर पाकिस्तानने शारजाहवर न्यूझीलंडला ५ गड्यांनी मात दिली आहे. न्यूझीलंडने नुकत्याच झालेल्या पाकिस्तान दौऱ्यातून अखेरच्या क्षणी माघार घेतली होती, पण आज पाकिस्तानाने आज न्यूझीलंडला हरवत नाचक्कीचा वचपा काढला आहे.

t20-wc-nz-vs-pak-pakistan-beat-new-zealand-by-5-wickets-news-update
t20-wc-nz-vs-pak-pakistan-beat-new-zealand-by-5-wickets-news-update

पाकिस्तानने टी २० वर्ल्डकपमध्ये लगातारा दुसऱ्यांदा सुपर १२ राउंडमध्ये विजय मिळवला आहे. मंगळवारी पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत करुन अपल्या ग्रुपमध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केलं आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात एका वेळेला रोमांचकारी सामना झाला होता. परंतु पाकिस्तानी खेळाडूंच्या उत्तम खेळीमुळे न्यूझीलंडवर मात करणं पाकला शक्य झालं आहे.

न्यूझीलंडकडून पाकिस्तानला १३५ धावांचे आव्हान देण्यात आले होते. पाकिस्तानच्या फलंदाजांनी १९ व्या षटकामध्येच विजय मिळवला आहे. पाकिस्तानच्या या विजयामुळे भारताला सेमी फायनलमध्ये पोहचण्याची आशा निर्माण झाली आहे. आता भारताला ३१ ऑक्टोबरला न्यूझीलंडला पराभूत करावे लागणार असून येणारे सामनेही जिंकावे लागणार आहेत.

टी २० विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना फारच रोमांचक ठरत आहे. पाकिस्तानी संघाने विश्वचषकातील आपला पहिलाच सामना जिंकल्याने साहजिकच संघाचा आत्मविश्वास उंचावर आहे, याचाच प्रत्यय आजच्या सामन्यातून समोर येत आहे, पाकिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचे सर्वच फलंदाज चितपट झाल्याचे पहायला मिळाले, न्यूझीलंडने २० षटकांत ८ बाद १३४ धावा करून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला १३५ धावांचे आव्हान दिले. मात्र पाकिस्तानच्या खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी करुन विजय मिळवला आहे.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पाकिस्तानने आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर सामन्यावर चांगलीच पकड बनवली आहे. न्यूझीलंडचे ४ फलंदाज १० षटकांच्या आतमध्येच बाद झाले होते, त्यामुळे पाकिस्तानी गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या संघावर चांगलाच दबाव राखून ठेवला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियमसन आणि डेव्हन कॉन्वे वगळता कोणत्याच फलंदाजाला २० धावांचा आकडा देखील गाठता आला नाही.

पाकिस्तानी गोलंदाजांचे वर्चस्व

पाकिस्तानी गोलंदाजाच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज चांगलेच चितपट झाले, पाकिस्तानकडून सर्वच गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. हरिस राउफने त्याच्या ४ षटकांत २२ धावा देऊन ४ बळी घेतले तर शाहिन आफ्रिदी, इमरान वसीम आणि मोहम्मद हफीज यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. पाकिस्तानी गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमक फलंदाजी ब्रेक लावण्यात यशस्वी झाल्याचे पहायला मिळत आहे.

पाकिस्तानी गोलंदाजांची कामगिरी

शाहीन आफ्रिदी ४ षटके २१ धावा देत १ बळी
इमरान वसीम ४ षटके २४ धावा देत १ बळी
हरिस राउफ ४ षटके २२ धावा देत ४ बळी
मोहम्मद हाफिज २ षटके १६ धावा देत १ बळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here