पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा रिक्त ठेवा : विनायक मेटे

vinayak-mete-demands-to-keep-13-percent-seats-vacant-for-maratha-in-police-recruitment
विनायक मेटेंनी केली ही मागणी vinayak-mete-demands-to-keep-13-percent-seats-vacant-for-maratha-in-police-recruitment

मुंबई : राज्यात १२ हजार ५२८ पोलिसांच्या जम्बो भरतीसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. दरम्यान, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा रिक्त ठेवा अशी मागणी केली आहे.

विनायक मेटे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत ही मागणी केली आहे. विनायक मेटे यांनी व्हिडीओ ट्विट करत म्हटलं आहे की, “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी रिक्त ठेवा. त्याच्यावर मंत्रिमंडळाचा निर्णय घ्या आणि सुप्रीम कोर्टाची परवानगी घेऊन नंतर भरुन टाका.

मराठा समाजातील तरुण-तरुणींना भरतीत सामावून करुन घेतलं तरच हे सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे असं म्हणता येईल. अन्यथा सगळी संतापाची प्रतिक्रिया रस्त्यावर पहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. असं मेटे म्हणाले.

अनिल देशमुख मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न

दरम्यान, अनिल देशमुख यांनी ट्विटरला व्हिडीओ शेअर करत मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं म्हटलं आङे. “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी बाजूला काढता येतील का हे कायद्यानुसार तपासू. राज्य सरकाराचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार आहे,” असं ते म्हणाले आहेत.

अशी होणार पोलीस भरती

पोलीस शिपाई संवर्गातील २०१९ या वर्षामधील ५२९७ पदे तसेच २०२० वर्षामधील ६७२६ पदे व मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२ हजार ५२८ पदे १०० टक्के भरण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here