Police Bharti Free Training l मोफत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण; इम्तियाज जलील यांचा पुढाकार

4 ते 6 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

1578 classrooms of schools are tinshaded; When will the construction of classrooms be completed? : Imtiyaz Jalil
1578 classrooms of schools are tinshaded; When will the construction of classrooms be completed? : Imtiyaz Jalil

औरंगाबाद : महाराष्ट्र पोलीस दलात मेगाभरती होणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरीब, होतकरु व कष्टकऱ्यांच्या मुला,मुलींना पोलीस खात्यात संधी मिळावी,यासाठी एमआयएमतर्फे (AIMIM) मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे. Police Bharti Free Training यासाठी खासदार इम्तियाज जलील Imtiyaz Jaleel यांनी पुढाकार घेतला आहे.

राज्य सरकार पोलीस खात्यात मेगा भरती करणार आहे. राज्यात प्रथम एवढीमोठी पोलीस भरती होणार आहे. सन २०२०-२०२१ यावर्षाकरिता १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागातील अनेक युवकांना पोलीस दलात सहभागी होता येणार आहे.

पोलीस भरती दरम्यान अनेक इच्छुक उमेदवार शासनस्तरावर अर्ज सादर करतात परंतु योग्य ते मार्गदर्शन व प्रशिक्षण नसल्याने तसेच मैदानी चाचण्यांचे सराव नसल्याने शारीरिक पात्रता असतांना सुध्दा उमेदवार निवडी पासुन वंचित राहतात.

पोलीस भरती दरम्यान उमेदवारांची अडचण लक्षात घेता पोलीस भरतीपूर्व उमेदवारांना मोफत मैदानी शारिरीक चाचण्यांचे प्रशिक्षण, सामान्य ज्ञान व इतर लेखी परिक्षेचे अभ्यासक्रम पूर्ण करुन सराव परिक्षा घेण्यात येणार अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.

राज्य शासनाच्या नियमानुसार सामान्य ज्ञान आणि शारीरिक चाचण्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये मराठी, गणित, बुध्दिमत्ता, सामान्य अध्ययन व चालू घडामोडी तसेच मैदानी सरावामध्ये धावणे (१०० व १६०० मी.), गोळाफेक व इतर चाचण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

हेही पाहा l VIDEO l चक्क ५ वर्षांची चिमुरडी वाजवतेय ड्रम

निवडलेल्या उमेदवारांना एकूण दोन महिने दररोज चार तासांचे वर्ग व मैदानी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त इच्छुक उमदेवारांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

पोलीस दलातील उच्च अधिकारी करणार मार्गदर्शन

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणा दरम्यान पोलीस दलातील उच्च अधिकारी उमदेवारांना मैदानी शारिरीक चाचण्यांचे प्रशिक्षण, सामान्य ज्ञान व इतर लेखी परिक्षेचे अभ्यासक्रम पुर्ण कसा करावा याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणार आहे. तसेच मैदानी चाचण्या व लेखी परिक्षेत जास्तीत जास्त गुणांनी उत्तीर्ण होण्याकरिता सरावादरम्यान अनेक टिप्स सुध्दा देणार आहे.

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण करिता निवड प्रक्रिया

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेण्याकरिता नोंदणी केलेल्या इच्छुक उमेदवारांची निवड करण्यासाठी लेखी परिक्षा घेण्यात येणार आहे. तद्नंतर परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तज्ञ प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

लेखी परिक्षेसाठी ही आहे अट

लेखी परिक्षेसाठी नोंदणी करण्याकरिता उमेदवारांना पुढील कागदपत्रे, अटी व शर्तीची पुर्तता करावी लागणार आहे. त्यामध्ये प्रशिक्षणार्थी उमदेवार शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम असावा, उमेदवार हा १८ ते २८ वयोगटातील असावा, पोलीस भरतीची शारीरिक पात्रता असणे आवश्यक म्हणजे उमेदवारांची उंची पुरुष १६५ से.मी. व महिला १५५ से.मी., छाती पुरुष ७९ से.मी. फुगवून ५ से.मी. वाढवावी, उमेदवार इयत्ता १२ वी उत्तीर्ण असावा.

हेही वाचा l walnuts Benefits अक्रोड खाण्याचे 10 फायदे जाणून घेऊयात

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण करिता अशी आहे नोंदणी प्रक्रिया

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणकरिता उमेदवारांनी नोंदणीसाठी येतांना सोबत पासपोर्ट सोईज फोटो, शैक्षणिक अर्हता गुणपत्रक, आधार कार्ड इ. कागदपत्रांच्या छायांकित प्रती अर्जासोबत आणणे आवश्यक राहील. दिनांक 4 ते 6 नोव्हेंबर 2020 रोजी, सकाळी 11.00 ते 3.00 वाजेदरम्यान दुआ बँक, खासदार कार्यालय, दिल्ली गेट जवळ, औरंगाबाद येथे नोंदणी करावी. असे आवाहन खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी केले आहे.

सर्व जातीधर्माच्या मुला,मुलींनी याचा लाभ घ्यावा – इम्तियाज जलील (खासदार)

पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणकरिता सर्व जातीधर्मातील मुला मुलींनी याचा लाभ घ्यावा. जे तरुण,तरुणी पोलीस खात्यामध्ये नोकरीसाठी इच्छूक आहेत. त्यांनी मोफत प्रशिक्षण घ्यावा. असे आवाहन एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी – शेख अझहर बाबर – 9823941123, शंकर महाबले – 9158590009, सय्यद मझहर – 9021249339, प्रित संगले, सय्यद फैसल, अशरफ पठाण, कृतिकेष आडे, सय्यद रेहानोद्दीन, यशश्री देशमुख, प्रणिता चींचोलीकर, मोहम्मद साबेर यांच्याशी संपर्क साधावा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here