औरंगाबादचे नामांतर चुकीचे: संजय निरुपमांचा काँग्रेसला घरचा आहेर!

काँग्रेसने शिवसेनेचा अजेंडा पूर्ण न करता स्वतःची तत्वे पाळावीत

aurangabad-rename-sambhajinagar-aurangabad-renaming-incorrect-instead-of-fulfilling-shiv-senas-agenda-congress-should-work-on-its-own-principle-slam-ex-mp-sanjay-nirupam-news-update-today
aurangabad-rename-sambhajinagar-aurangabad-renaming-incorrect-instead-of-fulfilling-shiv-senas-agenda-congress-should-work-on-its-own-principle-slam-ex-mp-sanjay-nirupam-news-update-today

मुंबई: औरंगाबादचे (Aurangabad) संभाजीनगर (Sambhajinagar) नामांतर प्रस्ताव नुकतेच महाविकास आघाडी (MVA) सरकारने मंजूर केले हे चुकीचे आहे. काँग्रेसने (Congress) कधीच नामांतराच्या मुद्द्यावर भर दिले नाही. शिवसेनेचा (ShivSena) अजेंडा पूर्ण करण्याऐवजी काँग्रेसने आपल्या तत्त्वावर काम करावे, काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध करावा, असे मत काँग्रेस नेते, माजी खासदार संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी व्यक्त केले. एक व्हिडिओ जारी करत निरुपम यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले आहे.

निरुपम म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतराचा एक खूप मोठा इतिहास आहे. औरंगाबादचे नामांतर सभांजीनगर करण्यासाठी शिवसेना आणि भाजपचा अजेंडा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, त्याला काँग्रेसने कधीच समर्थन दिलेले नाही. 1995-96 साली जेव्हा शिवसेना-भाजपची सरकार सत्तेत आली होती. त्यावेळी देखील औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये पास करण्यात आले होते आणि शहराचे नाव संभाजीनगर करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर संभाजीनगर नामांतराचा निर्णय रद्द करण्यात आला. 1999 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुप्रीम कोर्टाने आदेश पाळत नामांतराला स्थगिती दिली होती.

अजेंडासाठी शहरांचे नामांतर

पुढे निरुपम म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार कोसळ्यापूर्वी शेवटच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचे नामांतर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाला महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसने देखील पाठिंबा दिला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, सुरुवातीपासूनच काँग्रेस शहरांचे नामांतर करण्याच्या निर्णयाविरोधात आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला काँग्रेसच्या मंत्र्यांनी का पाठिंबा दिला हे मला कळाले नाही? उद्धव ठाकरेंनी आपल्या हिंदुत्वाच्या अजेंडासाठी शहरांचे नामांतरण केले, शिवसेनेचा अजेंडा पूर्ण करण्याऐवजी काँग्रेसने आता आपल्या तत्वावर काम करावे. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर आहे मात्र, ज्या प्रकारे शहराचे नामांतर करण्यात आहे निर्णय अयोग्य असून, यावर पुन्हा विचार केले गेले पाहिजे.

माजी मंत्री आरीफ नसीम खान पक्षश्रेष्ठींवर नाराज

महाविकास आघाडी सरकार कोसळ्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक कॅबिनेट मीटिंग बोलावत औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांचे नामांतर केल्याची घोषणा केली. त्यात औरंगाबाद शहराचे संभाजीनगर तर उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव असे करण्यात आले. नामांतरणाच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये तत्कालीन काँग्रेसचे मंत्री देखील उपस्थित होते. त्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. या प्रकारामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आरीफ नसीम खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नामांतर प्रस्तावावरून आरीफ नसीम खान यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना चांगलेच सुनावले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. नामांतर प्रकरण आता दिल्लीपर्यंत पोहोचले असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली. 


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here