Video: भाजप आमदार श्वेता महालेंच्या भावाचा मनसे कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, हल्यात पाय फ्रॅक्चर!

bjp-mla-chikhli-dist-buldhana-shweta-mahale-shivraj-patil-bitten-mns-worker-ajay-kharpas-in-chikhali-buldhana-mahrashtra-news-update
bjp-mla-chikhli-dist-buldhana-shweta-mahale-shivraj-patil-bitten-mns-worker-ajay-kharpas-in-chikhali-buldhana-mahrashtra-news-update

मुंबई : चिखली तालुक्यामध्ये मनसैनिक अजय खरपास (Ajay Kharpas) या युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हा हल्लेखोर भाजपच्या आमदार (BJP MLA) श्वेता महाले (Shweta Mahale) यांचा भाऊ शिवराज पाटील (ShivRaj Patil) हा असून त्याने तरूणाला बेदम मारहाण केली. असा आरोप अजय खरपास आणि त्यांच्या बंधूनी केला आहे.

सोशल मिडियावर टीका करणारी पोस्ट टाकल्याच्या रागात ही मारहाण झाल्याचा आरोप सदर फिर्यादीने केला आहे. धक्कादायक म्हणजे या तरूणाला मारहाण करून अर्धमेल्या अवस्थेत टाकून दिलं आणि उपचार केल्यास मारून टाकू अशी धमकी देण्यात आल्याचं फिर्यादीने माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. या मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, यात काही लोकं या तरुणाला मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

चिखली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार रविवारी संध्याकाळच्या सुमारास अजय खरपास या ३६ वर्षीय तरुणाला जबर मारहाण झाली. मिळालेल्या एफआयआरच्या प्रतिमधील माहितीनुसार शिवजयंती निमित्त टाकलेल्या एका फेसबूक पोस्टमध्ये सदरील तरुणाने टीका केली होती. त्यानंतर या तरुणाला सदर पोस्ट डिलीट कर म्हणून दबाव टाकण्यात आला. त्यानंतर त्याला बोलावून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी अजय काय म्हणाला…

रात्री नऊ वाजता, आमदाराचे बंधू शिवराज पाटील यांनी पानगोळे रुग्णालयाजवळ बोलावलं. त्यातून शिवराज पाटील आणि आणखी काहीजण उतरले. त्यांनी मला पकडलं, मी त्यांना विचारलं असं का करत आहात तर, त्यांनी आपल्याला मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मला रुग्णालयात गेल्यावरही मारहाण केली. इलाज करशील तर मारूण टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर आपण उपचारासाठी औरंगाबादला गेलो असं त्यांनी सांगितलं आहे

तरुणाच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार

‘कमळी बाई’ असा उल्लेख करत टाकलेल्या एका फेसबूक पोस्टनंतर आमदार श्वेता महाले यांच्या बंधूंनी आपल्या भावाला पोस्ट डिलीट करण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर त्यांनी फोन करून भावाला बोलावून घेतलं. चिखलीच्या पानगोळे रुग्णालयासमोर अजयला रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर तो उपचारासाठी चिंचोले रुग्णालयात गेला. तिथेही त्याला मारहाण झाली. या मारहाणीत त्याचा एक पाय फ्रॅक्चर झाला असून, दुसऱ्या पायालाही जबर जखम झाली आहे.

महालेंची दादागिरी वाढली…

आमदार श्वेता महालेंच्या कुटुंबियांची दादागिरी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या कार्यकर्त्यांनाही महाले यांच्या गुंडांनी मारहाण केली होती. तेव्हा महालेंच्या तक्रारीवरून उलट बोंद्रेंसह काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. आता मनसे सैनिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकारामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. महालेंची दादागिरी वाढली असून त्या महिला आहे म्हणून काही करतील का? अशी चर्चा जिल्ह्यात जोरदार सुरु आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here