Corona Vaccination: दोन लसींचा डोस घेणाऱ्या नागरिकांनाच सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणार,विनामास्क फिरल्यास दहा हजार रुपयांचा दंड

दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंटवर राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर

corona-virus-infection-without-mask-news-update
corona-virus-infection-without-mask-news-update

मुंबई: राज्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग आणि संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रत्येक नागरिकाला आता दोन लसीचे डोस घेणे बंधनकारक राहणार आहे. लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. दोन लसींचा डोस न घेतलेल्या नागरिकांना आता सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दोन लसीचा डोस घेणाऱ्या नागरिकांनाच आता सार्वजनिक वाहनाने प्रवास करता येणार आहे. तसेच विनामास्क ग्राहकांना १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली असून कोरोना लसीकरण वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हा निर्णय़ घेण्यात आला आहे. राज्य सरकारने कोरोना लसीकरणासाठी कडक नियमावली जारी केली आहे.

काय आहे नवी नियमावली

सार्वजनिक वाहन, रिक्षा, टॅक्सीतून प्रवासादरम्यान प्रवाशाने मास्क घातला नसल्यास चालक आणि प्रवासी दोघांकडून प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार

दुकानात ग्राहकाने मास्क घातला नसल्यास ग्राहकाला ५०० तर दुकानदाराला १० हजार रुपयांचा दंड

मॉलमध्ये ग्राहकांनी मास्क घातला नसेल तर थेट मॉल्स मालकांवर ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई

सभा, राजकीय क्रार्यक्रम, घरगुती कार्यक्रमांना परवानगी असेल परंतु नियमांचे उल्लंघन झाल्यास आयोजकावर ५० हजारांचा दंड

३ ते ७ डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये भारत-न्यूझीलंड कसोटीमध्ये २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा: Bank Holiday in December 2021: डिसेंबरमध्ये 12 दिवस बंद राहणार बँका, पाहा सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट

दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंटवर राज्य सरकारची कडक पावलं

जगभरात आणि दक्षिण अफ्रिकेमध्ये ऑमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. ही चिंतेची बाब असून केंद्र सरकार आणि राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. कोरोनाची तिसऱ्या लाटेची भीती असताना आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे चांगलीच चिंतेत भर पडली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक आयोजित बोलावली आहे. तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत नव्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here