Crime News: औरंगाबादेत चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क पाच दुचाकी, एक रिक्षा लांबविल्या

Crime News: Five two-wheelers and one rickshaw were stolen from thieves in Aurangabad
Crime News: Five two-wheelers and one rickshaw were stolen from thieves in Aurangabad

औरंगाबाद: औरंगाबाद शहर परिसरातून दुचाकी, तीन चाकी, चारचाकी वाहनांच्या चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. शहरातून पुन्हा पाच दुचाकी व एक रिक्षा चोरीची नोंद विविध पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. चोरीच्या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

पहिली घटना- संतोष शंकर भोंबे (३०) रा.आईसाहेब चौक यांनी ११ डिसेंबर रोजी घरासमोर स्कुटी क्रमांक एमएच-२०-सीव्ही-२५७५ उभी करुन ठेवली होती. अज्ञात चोरट्यांनी स्कुटी लंपास केली. अशी तक्रार १९ डिसेंबर रोजी हर्सूल पोलिस ठाण्यात दिली.

दुसरी घटना- अमित देशमाने (४०) रा.शिवाजी नगर यांनी १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास डी.मार्ट गारखेडा परिसराच्या बाजुला गारखेडा परिसरात दुचाकी क्रमांक एमएच-२०-एफए-०९२९ उभी करुन भाजीपाला आणण्यासाठी गेले. चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. अशी तक्रार जवाहरनगर पोलिस ठाण्यात १९ डिसेंबर रोजी दिली.

तिसरी घटना- रईस पाशु शेख (२८) रा.एन-६ चिश्तिया कॉलनी यांनी ८ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता वासु ग्रिव्हीज कंपनीच्या पार्कींगमध्ये दुचाकी क्रमांक एमएच-२०-एफडी-६५५७ उभी करुन ठेवली असता चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात १९ डिसेंबर रोजी तक्रार दिली.

चौथी घटना- सोमिनाथ कृष्णा रावळकर (२४) रा. विशाननगर गजानन महाराज मंदिर यांनी १७ डिसेंबर रोजी १२.३० वाजेच्या सुमारास एमजीएमच्या गेट क्रमांक ७,८ मध्ये दुचाकी क्रमांक एमएच-२१-बीए-३२१० उभी करुन ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. अशी तक्रार सिडको पोलिस ठाण्यात १९ डिसेंबर रोजी दिली.

पाचवी घटना- अजरोद्दीन अहमद शेख (३५) रा. मकसुद कॉलनी रोशन गेट यांनी १७ डिसेंबर रोजी जाफर गेट मोंढा नाका येथे रुपेश कंपनीच्या दुकानासमोर दुचाकी क्रमांक एमएच-२० डिपी-४१९५ उभी करुन ठेवली असता चोरट्यांनी लंपास केली. अशी तक्रार क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दिली.

सहावी घटना- महिला फिर्यादीच्या तक्रारीनुसार अंबिकानगर गल्ली नंबर-२ मुकुंदवाडी येथे ३ डिसेंबर रोजी रिक्षा क्रमांक एमएच-२०-बीटी-८८१६ उभी करुन ठेवली होती. चोरट्यांनी ती लंपास केली. अशी तक्रार मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात १९ डिसेंबर रोजी दिली.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here