दिलासादायक: कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिनच्या आपातकालीन वापराला मंजुरी

dcgi-big-announcement-in-press-conference-covishield-and-covaxin-approved-for-emergency-use-india
dcgi-big-announcement-in-press-conference-covishield-and-covaxin-approved-for-emergency-use-india

नवी दिल्ली l भारतात कोविशिल्ड Covishield आणि कोव्हॅक्सिन Covaxin या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराची संमती देण्यात आली आहे. सीरम Serum institute आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसींचा यामध्ये समावेश आहे. अशी माहिती डीसीजीआयने DCGI पत्रकार परिषदेत दिली आहे.

भारतात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यानंतर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. कालच ड्राय रनही पार पडला. आता प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना संमती मिळते की नाही याची. दरम्यान दोन्ही लसींना संमती देण्यात आली आहे. लसीकरणाच्या मोहिमेतलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.

या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत असं डीसीजीआयने म्हटलं आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ट्वीट

पंतप्रधान मोदींनी यावर ट्वीट करत म्हटले आहे, ‘प्रत्येक भारतीयाला गर्व असेल की ज्या दोन लशींचा आपातकालीन वापरासाठीची परवानगी देण्यात आली आहे त्या भारतात बनलेल्या आहेत. हे आपल्या वैज्ञानिक समूहाच्या उत्सुकतेचे प्रतीक आहे. एका आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करणे याच्या मुळाशी आहे.’

 दोन दिवसांत मिळाली मंजुरी

देशी औषध उत्पादन कंपनी भारत बायोटेकने शनिवारी म्हटले होते की कोव्हॅक्सिन या त्यांच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीसाठी देशभरातील साधारण २६,००० स्वयंसेवक एकत्र करण्याच्या लक्ष्याच्या ते जवळ आहेत.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेकाच्या कोव्हिशील्ड या लशीला आपातकालीन वापरासाठी मंजुरी मिळण्याच्या अर्जाला मान्यता दिल्यानंतर एका दिवसाने कोव्हिशील्डला मंजुरी देण्यात आली आहे.

 लसीकरण प्रक्रियेची केली आखणी

देशभरात कोरोनाच्या लसीच्या लसीकरणाची प्रक्रिया चालू करण्यासाठी सरकार पूर्णपणे सज्ज आहे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की याची तयारी निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच केली जात आहे. या बहुप्रतिक्षित लसीची ड्रायरन ही शनिवारी पूर्ण देशात यशस्वीरित्या पार पडली.

निवडणुकीप्रमाणेच इथेही बूथच्या स्तरापर्यंत तयारी करण्यात आली आहे आणि हजारो लोकांना या प्रक्रियेबद्दलचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना कोरोनाची लस दिली जाईल आणि हे लसीकरण निःशुल्क असेल असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : छत्रपती संभाजी महाराज मराठा समाजाचे राजे नव्हे तर अठरापगड जातींचे राजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here