आषाढी वारी l मानाच्या ‘या’ 10 पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी

भाविकांसाठी मंदिर बंद, पायी जाता येणार नाही

Ncp-leader-ajit-pawar-replay-raj-thackeray-statement-one-two-project-going-out-maharashtra-not-difference-news-update-today
Ncp-leader-ajit-pawar-replay-raj-thackeray-statement-one-two-project-going-out-maharashtra-not-difference-news-update-today

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारीनिमित्त मोजक्या पालख्यांना परवानगीची घोषणा केली आहे. पवारांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील 10 मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी देण्याचा निर्णय कॅबिनेटकडून घेण्यात आला आहे. या सर्व पालख्या बसमधून जातील. यासाठी राज्य सरकारकडून 20 बस दिल्या जाणार आहेत अशी माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिली.Deputy-chief-minister-ajit-pawar-announces-20-busses-for-10-ashadhi-palkhi-in-maharashtra

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा आषाढी पालखीला परवानगी मिळणार की नाही यावर संभ्रम होते. तेच दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये माहिती देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, की कोरोना काळात आषाढी वारीसाठी पालख्यांना परवानगी देण्यावर निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची कालच (गुरुवारी) बैठक पार पडली. त्याच समितीने राज्य सरकारला दिलेल्या अहवालावर राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाच्या आणि मानाच्या अशा सर्व 10 पालख्यांना बसमधून जाण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा :शिवसेनेनं राहुल गांधींना दिला ‘हा’ सल्ला!

पायी जाण्याची परवानगी नाही, मंदिर भाविकांसाठी बंद
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की वारीला जाण्यासाठी 20 बस दिल्या जात आहेत. त्या पालख्यांसोबत जातील. पालख्यांसोबत या बसमधून जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे. त्यातही कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे.

देहू-आळंदी पालखीसोबत 100 लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. वारी बसमधूनच निघावी. कुणालाही पायी वारीसाठी जाता येणार नाही. उत्साहाच्या भरात लोकांनी पालखीभोवती गर्दी करू नये असे आवाहन सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे. विशेष म्हणजे, रिंगण आणि रथोत्सव यांना अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली. मात्र, भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंदच राहणार आहे.

या दहा मानाच्या पालख्यांना परवानगी
1. संत निवृत्ती महाराज, त्र्यंबकेश्वर 2. संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी 3. संत सोपान काका महाराज, सासवड 4. संत मुक्ताबाई, मुक्ताईनगर 5. संत तुकाराम महाराज, देहू 6. संत नामदेव महाराज, पंढरपूर 7. संत एकनाथ महाराज, पैठण 8. रुक्मिणी माता, अमरावती 9. संत निळोबाराय, अहमदनगर, 10) संत चांगाटेश्वर महाराज, सासवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here