मुंबई : मुंबईत 24 तासांत दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. पालघरनंतर मुंबई आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसले. उत्तर मुंबईमध्ये शनिवारी सकाळी 6.36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले. 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता होती. नाशिक जिल्ह्यात रात्री उशिरा भूकंपाचे धक्के बसले. 4 रिश्टर स्केल या भूकंपाची तीव्रता होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने भूकंपाची माहिती दिली.
डहाणू मध्ये मध्यरात्रीच्या सुमरास भूकंपाचे दोन मध्यम झटके बसल्याने डहाणू, पालघर व तलासरी तालुक्यात अनेक भागाला कंप जाणवला. रात्री 11.42 वाजता 4.0 तीव्रतेचा तर मध्यरात्री 12.05 वाजता 3.6 तीव्रतेचा धक्का बसला. अनेक नागरिक झोपेत असताना या धक्क्यामुळे भांडी, वस्तु पडल्याने खडबडून जागे झाले. एकच धावपळ उडाली.
मागच्या महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पालघरमध्ये झालेल्या या सौम्य भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नव्हते. पालघर जिल्ह्यात 2.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नव्हती. या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.