Sania Mirza Women Fighter Pilot :टिव्ही मेकॅनिकची मुलगी बनली फायटर पायलट

a-tv-mechanics-daughter- Sania-Mirza-turned-fighter-pilot-a-success-that-defied-the-odds-news-update
a-tv-mechanics-daughter- Sania-Mirza-turned-fighter-pilot-a-success-that-defied-the-odds-news-update

मिर्झापूर (उत्तरप्रदेश): उत्तर प्रदेशातील मिर्झापूरची तरुणी सानिया मिर्झा Sania Mirza हवाई दलात भारताची दुसरी महिला फायटर पायलट (Women Fighter Pilot)   बनणार आहे. सानियाने एनडीए परीक्षेत 148 वा क्रमांक पटकावला आहे. सानिया ही देहत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जसोवर या छोट्याशा गावातील रहिवाशी आहे.

सानियाने गुरू नानक गर्ल्स इंटर कॉलेज, मिर्झापूरमधून १२वीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ती यूपी १२ वी बोर्डात जिल्हात अव्वल आहे. १० एप्रिल रोजी तिने एनडीए २०२२ ची परीक्षा दिली. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिने मुलाखतीची तयारी करण्यासाठी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. वृत्तानुसार, सानिया २७ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यातील खडकवासला एनडीएमध्ये सामील होणार आहे.

वडील टीव्ही मेकॅनिक

व्यवसायाने टीव्ही मेकॅनिक असलेले सानियाचे वडील शाहिद अली म्हणाले, ‘सानिया मिर्झा देशाची पहिली फायटर पायलट अवनी चतुर्वेदीला आपला आदर्श मानते. पहिल्यापासूनच तिला  अनवी सारखं व्हायचं होतं. सानिया ही देशातील दुसरी अशी मुलगी आहे, जिची फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे.

गावातील प्रत्येक मुलीला दिली प्रेरणा

सानियाची आई तबस्सुम मिर्झा म्हणाली, ‘आमच्या मुलीमूळे आम्हाला आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटताे आहे. फायटर पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण करून तिने आपल्या गावातील प्रत्येक मुलीला प्रेरित केले आहे.

यशाचा खडतर प्रवास

सानिया मिर्झा ही देशातील दुसरी अशी मुलगी आहे, जिची फायटर पायलट म्हणून निवड झाली आहे. सानिया पहिल्यांदा ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, त्यामुळे तिने पुन्हा परीक्षा दिली. सानिया म्हणाली की, फायटर पायलट बनणे हे माझे ध्येय होते. सानियाचा प्रेरणास्रोत अवनी चतुर्वेदी ही देशातील पहिली महिला पायलट आहे. पहिल्यापासूनच तिला अवनी सारखं व्हायचं होतं.

विशेष म्हणजे, नॅशनल डिफेन्स अकादमी २०२२ च्या परीक्षेत पुरुष आणि महिलांसाठी एकूण ४०० जागा होत्या, ज्यामध्ये १८ जागा महिलांसाठी होत्या. त्याच वेळी, यापैकी दोन जागा लढाऊ वैमानिकांसाठी राखीव होत्या. या दोनपैकी एक जागा सानिया मिर्झाने मिळवली आहे. एका टिव्ही मेकॅनिकच्या मुलीने अत्यंत प्रतीकुल परिस्थीतिवर मात करून मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here