IPL 2020, DC vs KKR : दिल्लीचा कोलकातावर 18 रन्सने विजय

ipl-2020-dc-vs-kkr-match-16-delhi-capitals-won-by-18-runs/
IPL 2020, DC vs KKR : दिल्लीचा कोलकातावर 18 रन्सने विजय ipl-2020-dc-vs-kkr-match-16-delhi-capitals-won-by-18-runs/

Indian Premier League 2020, DC vs KKR: आयपीएल 2020 (IPL 2020) सीझनमधील 16वी मॅच शारजाह येथील शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात झाली. या मॅचमध्ये दिल्लीच्या टीमने कोलकातावर 18 रन्सने विजय मिळवला.

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब झाली. सुनील नरिने अवघ्या तीन रन्स करुन माघारी परतला.

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावत 210 रन्सपर्यंतच मजल मारता आली. कोलकाताच्या टीमकडून नितीश राणा याने सर्वाधिक म्हणजेच 58 रन्स केल्या. ईऑन मॉर्गन याने 44 रन्स, राहुल त्रिपाठी याने 36 रन्स, आंद्रे रसेल 13 रन्स केल्या.

दिल्ली  पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल 

कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करुन दिल्लीची टीम आयपीएल 2020च्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर दाखल झाली आहे. दिल्लीच्या टीमने आतापर्यंत एकूण 4 मॅचेस खेळल्या असून त्यापैकी तीन मॅचेस जिंकत दिल्लीने आपल्या खात्यात सहा पॉईंट्स जमा केले आहेत. या सहा पॉईंट्ससह रनरेट अधिक असल्याने दिल्ली कॅपिटल्सची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.

मॅचच्या सुरुवातीला कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात बॅटिंग करण्यासाठी आलेल्या दिल्लीच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावत 228 रन्स केल्या आणि कोलकातासमोर विजयासाठी 229 रन्सचं आव्हान उभं केलं.

प्रथम बॅटिंगसाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या टीमची सुरुवात चांगली आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी 56 रन्सची पार्टनरशिप केली. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक रन्स केल्या. श्रेयस अय्यरने 38 बॉल्समध्ये नॉट आऊट 88 रन्स केल्या. पृथ्वी शॉ याने 66 रन्स, रिषभ पंत याने 38 रन्स, शिखर धवनने 26 रन्स केल्या.

वाचा : IPL2020,SRH VS : हैदराबादचा चेन्नईवर विजय

कोलकाताच्या टीमकडून आंद्रे रसेल याने 2 विकेट्स घेतल्या. आंद्रे रसेल याने 4 ओव्हर्समध्ये 29 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. तर कमलेश नागरकोट्टी आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.

 भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अमित मिश्राने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. शारजात कोलकाता नाईट रायडर्स संघाविरोधात सामना खेळत असताना अमित मिश्राने दिल्लीकडून आयपीएलमध्ये १०० व्या बळीची नोंद केली आहे. कोलकात्याच्या शुबमन गिलला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत मिश्राने हे अनोखं शतक साजरं केलं. शुबमन गिल २८ धावा काढून माघारी परतला.

महत्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीच्या एकाही गोलंदाजाला आतापर्यंत अमित मिश्राने केलेली कामगिरी जमलेली नाही. भारतीय संघात अमित मिश्राला गेल्या काही वर्षांत स्थान मिळालेलं नसलं तरीही आयपीएलमध्ये दिल्लीकडून तो आपली कामगिरी चोख बजावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here