IPL 2020, SRH vs CSK: हैदराबादचा चेन्नईवर 7 धावांनी विजय

ipl-2020-sunrisers-hyderabad-beats-chennai-super-kings-by-7-runs
हैदराबादचा चेन्नईवर 7 धावांनी विजय ipl-2020-sunrisers-hyderabad-beats-chennai-super-kings-by-7-runs

Indian Premier League 2020, SRH vs CSK: आयपीएल 2020 (IPL 2020) मधील 14 वा सामना दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम (Dubai International Cricket Stadium) मध्ये सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात झाला. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या टीमने चेन्नईच्या टीमवर 7 धावांनी विजय मिळवला आहे.

हैदराबादने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या टीमची सुरुवात खराब झाली. सनरायजर्स हैदराबादच्या बॉलर्स समोर चेन्नई सुपर किंग्जच्या टीमला चांगले प्रदर्शन दाखवता आले नाही. चेन्नईच्या रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी टीमला सावरलं मात्र, विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आलं.

चेन्नईच्या टीमकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक म्हणजेच 50 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जच्या टीमला 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 157 धावा पर्यंतच मजल मारता आली. यामुळे हैदराबादच्या टीमने चेन्नईचा पराभव केला.

सनरायजर्स हैदराबादच्या टीमकडून टी नटराजन याने 2 विकेट्स घेतल्या तर भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समद यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. मॅचच्या सुरूवातीला हैदराबादच्या टीमने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या टीमला सुरुवातीला वेगाने रन्स करता आले नाही.

वाचा : IPL2020,KXIP VSMI : मुंबईचा पंजाबवर दणदणीत विजय

11 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावत त्यांचा स्कोअर 69 रन्स होता. त्यानंतर प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा यांनी टीमला सावरलं. यामुळे हैदराबादच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 165 धावांपर्यंत मजल मारली आणि चेन्नई समोर विजयासाठी 166 धावांचे आव्हान ठेवले.

हैदराबादच्या टीमकडून प्रियम गर्ग याने 51 धावा, अभिषेक शर्माने 31 रन्स, मनिष पांडेने 29 धावा, डेविड वॉर्नर याने 28 धावा केल्या. तर चेन्नई सुपर किंग्जच्या टीमकडून दीपक चहर याने 2 विकेट्स घेतल्या तर शार्दुल ठाकूर आणि पियूष चावला यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.

पाहा : VIDEO महिंद्राची Mahindra-thar नवी थार जीप लाँच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here