मुंबई : गोरेगाव येथील आरेची 600 एकर जागा ही वनासाठी राखीव आहे. परंतु या जागेवर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रो 3 साठी कारशेडचे काम सुरु केले होते. तो निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने रद्द केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन, आम्ही शब्द पाळला असे म्हटले आहे.
आरेच्या जंगलातील दोन हजार झाडांची कत्तल करुन मेट्रो कारशेडचे काम फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सुरु होते. त्याबाबत निसर्गप्रेमींसह शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेसने आक्षेप घेतला होता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तो फडणवीसांना दणका दिला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला.
ना. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन आमच्या सरकारने शब्द पाळल्याचे म्हटले. आपण आंदोलनावेळी तुरुंगात गेलो होतो, याची आठवणही करुन दिली. तसेच सर्व वृक्षप्रेमींनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं.