Mamata Banerjee l भाजपाकडून निवडणुकीपूर्वी गुंड आणून शांतता भंग करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री ममता बँनर्जींचा भाजपावर खळबळजनक आरोप

mamata-banerjee-bjp-tmc-before-election-law-and-order- west-bengal-governor-jagdeep-dhankar
mamata-banerjee-bjp-tmc-before-election-law-and-order- west-bengal-governor-jagdeep-dhankar

मुंबई l पश्चिम बंगालमध्ये west Bengal पुढच्या वर्षी 2021 मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस Trinamool congress आणि भाजपाने BJP जोरदार तयारी सुरु झाली आहे. ममता बॅनर्जी Mamata Banerjee यांनी भाजपावर  निशाणा साधला आहे. निवडणुकीपूर्वी बाहेरच्या गुंडांना आणलं जात असून ते शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी Mamata Banerjee  यांनी केला आहे.

भाजपा आणि तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही आता सुरू झाल्या आहेत. कुच बिहार जिल्ह्यात एका भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह सापडल्याची घटना घडली होती. त्यानंतर अशा घटनांवरून राज्यपालांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. “कायदा आणि सुव्यवस्थेला राजकारणापासून वेगळं ठेवलं गेलं पाहिजे हे मी राज्य सरकारला कायमच सांगत आलो आहे.

हेही वाचा l फडणवीसांच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींवर पोहचली;ऊर्जामंत्र्यांचा आरोप

काही अधिकारी असे आहेत जे खरंच असं करत आहेत. आपल्याला राजकीय हिंसाचार थांबवायला हवा,” असं राज्यपाल म्हणाले होते. “राज्यात कोणत्याही हिंसाचाराशिवाय आणि निष्पक्ष निवडणुका पार पडाव्या यासाठी मी माझ्या अधिकारांचा वापर करून सर्वकाही करेन. मला निवडणुकांच्या निकालाशी घेणंदेणं नाही. परंतु कायदा-सुव्यवस्था आणि मतदारांचं समाधान महत्त्वाचं आहे,” असंही ते म्हणाले होते.

हेही वाचा l SBI मध्ये नोकरीची संधी, आजच करा अर्ज

तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी भाजपावर हल्लाबोत केला. “निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये बाहेरील गुंड आणून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणी इतकाही स्तर ओलांडू नये. मी जनतेसोबत आहे. त्यांनी काळजी करण्याची कोणतीही गरज नाही. तुमच्यावर कोणीही हल्ला करू नये याची काळजी घेण्याचे पोलिसांना निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगाल घाबरणारं राज्य नाही,” असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here