Bigg Boss 16 Final Updates: पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन (अल्ताफ तडवी शेख) ठरला ‘बिग बॉस १६’ चा विजेता ठरला आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, प्रियंका चहर चौधरी, अर्चना गौतम आणि शालीन भानोत या पाच स्पर्धकांपैकी हा शो कोण जिंकणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. सलमान खान ने आज विजेत्याची घोषणा केली. प्रियंका चौधरीची सर्वात जास्त चर्चा होती. मात्र, एमसी स्टॅनला मानणारा मोठा वर्ग असून त्याने बिग बॉसमध्ये चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले.
बिग बॉसच्या १६ व्या सीजनने सुरूवातीपासूनच टीआरपीमध्ये धमाका केला आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन (MC Stan), प्रियंका चौधरी, अर्चना गौतम आणि शालिन भनोट हे टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिग बॉसचा ग्रँड फिनाले हा तब्बल पाच तासापेक्षाही अधिक वेळ चालला आहे. यामध्ये शालिन भनोट याच्यापासून ते सुंबुल तौकीर खान यांचे डान्स बघायला मिळाले. सलमान खान (Salman Khan) याने देखील यावेळी जबरदस्त मनोरंजन प्रेक्षकांचे केले. या ग्रँड फिनालेमध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे प्रियंका आणि शिव ठाकरे यांचा डान्स. सुरूवातीपासूनच बिग बाॅसच्या घरात शिव ठाकरे आणि प्रियंका चौधरी यांच्यामध्ये खटके उडताना दिसत होते. मात्र, धमाकेदार यांनी डान्स केला. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सतत चर्चा होत्या की, अखेर बिग बॉस १६ (Bigg Boss 16) चा विजेता कोण होणार? चाहते आपल्या आवडत्या स्टारला सपोर्ट मोठ्या प्रमाणात करत होते. शेवटी आता बिग बॉस 16 ला त्याचा खरा विजेता मिळाला आहे. ट्रॉफीसाठी शिव ठाकरे, प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित सुरूवातीपासूनच होती.
सोशल मीडियावर सर्वात जास्त शिव ठाकरे आणि एमसी स्टॅनच्या नावाची चर्चा होती. आता शेवटी बिग बॉस १६ ला त्याचा विजेता मिळाला आहे. एमसी स्टॅन याने बिग बॉस १६ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.
Aapke pyaar aur votes ne banaaya inhe Bigg Boss ke season 16 Ka winner. 🥰❤️#BiggBoss16 #BB16 #BiggBoss #MCStan pic.twitter.com/zEFCUoVBnw
— ColorsTV (@ColorsTV) February 12, 2023
तिसऱ्या क्रमांकावर प्रियंका चौधरी ही बिग बॉसच्या घराबाहेर पडल्याने अनेकांना मोठा धक्का बसला. एकीकडे अंकित गुप्ता हा रडताना दिसला तर दुसरीकडे आनंदाने उड्या मारताना साजिद खान आणि अब्दु दिसले.
सुरूवातीपासूनच मंडळीची इच्छा होती की, काहीही झाले तरीही बिग बॉस १६ ची ट्रॉफी ही मंडळीकडेच आली पाहिजे. शेवटी तेच घडले आणि बिग बॉस १६ ची ट्रॉफी मंडळीकडेच आलीये.
फायनलमध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेजण होते. वोट सर्वात जास्त मिळाल्याने एमसी स्टॅन हा बिग बॉस १६ चा विजेता झाला. मंडळीकडे ट्रॉफी आल्याने सर्वांनाच मोठा आनंद झाला.
एमसी स्टॅन हा एक रॅपर असून तो पुण्यातील आहे. सुरूवातीपासून एमसी स्टॅन याचा गेम जबरदस्त होता. तो कधीही घरामध्ये नाटक करताना दिसला नाही. मंडळीमधील महत्वाचा सदस्य एमसी स्टॅन हा होता.