उध्दव ठाकरेंसह शरद पवार आणि संजय राऊतांना धमकी देणा-या पलाश बोसला बेड्या

meeting-at-the-nehru-center-Sharad-pawar-uddhav-thackeray-malikaejun-kharge-sanjay-raut
meeting-at-the-nehru-center-Sharad-pawar-uddhav-thackeray-malikaejun-kharge-sanjay-raut

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा अखेर गजाआड झाला आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कोलकात्यातून एकाला अटक केली. (Mumbai ATS arrests Kolkata Man for threat calls to CM Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांना 2 ते 6 सप्टेंबर या कालावधीत धमकीचे फोन केल्याचा आरोप आहे. 49 वर्षीय आरोपी पलाश बोसला हा कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा जिम प्रशिक्षक असल्याची माहिती आहे.

आरोपी पलाश बोस दहा वर्ष दुबईत होता कामाला

आरोपी पलाश बोसला कोलकातामधून अटक केली असली, तरी तो काही वर्षांपूर्वही दुबईला होता. दुबईत याचे काही धागेदोरे सापडतात का? याचा तपास करत असल्याची माहिती एटीएसने पत्रकार परिषदेत दिली. तो कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नाही. मानसिकदृष्ट्या व्यवस्थित आहे, असेही एटीएसने सांगितले.

दुबईत कोणासोबत त्याचे संपर्क आहेत, त्याच्याकडे किती सिम कार्ड आहेत, कोणते अ‍ॅप आहेत, कोणत्या टीम किंवा गॅंगशी संबंध आहे का, याबाबत चौकशी सुरु आहे. आतापर्यंतच्या तपासात त्याचा कोणताही रेकॉर्ड असल्याचं सापडलं नाही, अशीही माहिती एटीएसने दिली.

कंगना रनौतपासून लांब राहण्याची धमकी त्याने दिली होती

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात भाष्य करणारी अभिनेत्री कंगना रनौतपासून लांब राहण्याची धमकी त्याने दिली होती. संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले असता त्याने आपण कंगनाचा चाहता असल्याचे सांगितले होते. राऊत यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर कोलकात्यातील त्याचा ठावठिकाणा शोधण्यात आला. कोर्टाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून मुंबई पोलिसांना आरोपीची चार दिवसांची कोठडी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here