महागाई व इंधन दरवाढ विरोधात काँग्रेस नेते हँगिंग गार्डनपासून सायकलने राजभवनावर धडकणार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

We will expose the Modi government and 'Yedya's' government through Jan Samswad Yatra: Nana Patole
We will expose the Modi government and 'Yedya's' government through Jan Samswad Yatra: Nana Patole

मुंबई l मोदी सरकारच्या जुलमी व अन्यायी कारभाराने जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईतून जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार इंधनाचे दर दररोज वाढवत आहे. आजही सीएनजी व पाईप गॅसचे दर वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. काँग्रेस पक्ष या महागाईच्या विरोधात रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध करत असून गुरुवार (१५ जुलै) रोजी राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका सामान्य जनतेला बसत आहे. इंधन, गॅस, खाद्यतेल, डाळींच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. जगणे मुश्कील केलेल्या या सरकारविरोधात काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे.

७ जुलैपासून राज्यात विविध आंदोलने करून मोदी सरकारच्या या अन्यायी महागाईविरोधात आवाज उठवला आहे. उद्या हँगिंग गार्डनपासून राजभवन पर्यंत सायकल रॅली काढून राज्यपालांना निवेदन देणार आहे. जनतेचा आवाज केंद्र सरकारच्या कानावर पडेल आणि झोपी गेलेल्या मोदी सरकारने जागे होऊन जनतेला दिलासा द्यावा यासाठी काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे, असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा

Medical officers Retirement Age 62 l ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय आता ६२ वर्षे

जसे भाजपात रावसाहेब दानवे तसे काँग्रेस पक्षात नाना पटोले;शिवसेनेचा टोला

“ताई तुमच्या पक्षात पंख छाटणारा शकुनी मा.मु. मोठा चतुर आहे हे विसरू नका”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here