oppo-A93 स्मार्टफोन हेलियो चिपसेटसह लाँच

पाहा फिचर्स आणि किंमत

oppo-a93-quad-camera-and-helio-chipset-launch
oppo-a93-quad-camera-and-helio-chipset-launch

स्मार्टफोन निर्माता कंपनी ओप्पोने व्हिएतनाममध्ये  oppo-A93 मॉडेल लाँच केला आहे. जो एफ 17 प्रोचा एक प्रकार आहे. गेल्या महिन्यात एफ 17 प्रो भारतात लॉन्च करण्यात आला होता.

ओप्पो A93 black ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाइट कलरमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या 8 जीबी -128 जीबीच्या व्हेरिएंटची  किंमत 324 डॉलर आहे. या हँडसेटमध्ये 6.43 इंचीचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले आहे आणि त्याचा आस्पेक्ट रेशियो 20: 9 आहे. यात इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.

या फोनमध्ये मेडियाटेक हेलियो पी 95 चिपसेट आहे. तसेच या फोनमध्ये क्वाड कॅमेरा देण्यात आला आहेत. त्याचा मुख्य सेन्सर 48 एमपी आहे आणि 8 एमपीचा अल्ट्रा वाइड सेन्सर देखील आहे. यात दोन 2 एमपी कॅमेरा देखील आहेत. त्याचा सेल्फी कॅमेरा ड्युअल लेन्सचा असून तो 16 एमपीचा आहे.

 Oppo A53 स्मार्टफोन भारतात झाला लॉन्च

दरम्यान, काही दिवसांपूर्वी : ओप्पोनं आपल्या प्रसिद्ध अशा ए सीरिजच्या पोर्टफोलियोला पुढे नेत भारतात आणखी एक नवीन स्मार्टफोन Oppo A53 लॉन्च केला होता. फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज वेरिएंटटी किंमत १२,९९० रुपये आणि ६ जीबी रॅम सोबत १२८ जीबी इंटरनल स्टोरेज वॅरिएंटची किंमत १५,४९० रुपये आहे.

पाहा : सिंघम फेम अभिनेत्री काजल अग्रवाल लग्नाच्या बेडीत अडकणार

ओप्पोचा पहिला फोन आहे जो इतक्या कमी किमतीत 90Hzचे रिफ्रेश रेट वाला डिस्प्ले ऑफर करत आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये येणाऱ्या फोनमध्ये पंच होल सेल्फी कॅमेऱ्यासोबतच ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि बॅटरी यासारखे जबरदस्त फीचर्स देत आहे.

पाहा : poco M2 स्मार्टफोन 11 हजारांपेक्षा कमी किंमतीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here