Realme ने लाँच केले ३ स्मार्टफोन, पाहा VIDEO किंमत आणि फीचर्स

तिन्ही स्वस्त स्मार्टफोन हे रिअलमी डॉट कॉम, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोअरवर उपलब्ध

realme- launched-3-smartphones-in Narzo 20 Pro-narzo-20-narzo-20a –in -india
रियलमीचे नवीन फोन लाँच realme- launched-3-smartphones-in Narzo 20 Pro-narzo-20-narzo-20a –in -india

स्मार्टफोन ब्रँड रियलमीने (Realme) नारजो सीरीजमधील तीन स्मार्टफोन (smartphones) भारतात (India) लॉन्च (launched) केले आहेत. या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात नवीन प्रोसेसर, फास्ट चार्जिंग आणि मोठ्या बॅटरी आहेत.

या सीरीजमध्ये नारजो 20 प्रो देखील आहे, ज्यात पॉवरफुल 65 व्हॅट चार्जिंग टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. तर नारझो 20 प्रोमध्ये  (Narzo 20 Pro)गेमिंग हार्डवेअर देखील आहे. तसेच या सीरीजअंतर्गत स्वस्त नारजो 20 ए देखील लाँच करण्यात आला आहे.

Narzo 20 Pro 25 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध

6.5 इंची स्क्रीन नारजो 20 प्रो मध्ये (Narzo 20 Pro) मेडियाटेक हेलियो जी 95 प्रोसेसर आहे आणि 48 एमपी एआय क्वॉड कॅमेरा सेटअप, 90 हर्ट्ज स्मूथ डिस्प्ले आणि 4500mAh बॅटरी आहे. हा फोन 6 जीबी -64 जीबी आणि 8 जीबी -128 जीबी व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. आणि त्यांची किंमत अनुक्रमे 14,999 आणि 16,999 रुपये आहे. हा फोन 25 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Narzo 20 हा फोन 28 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध

नारझो 20 (Narzo 20) मध्ये मेडियाटेक हेलियो जी95 प्रोसेसर आहे. ज्यामध्ये 48 एमपी एआय ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि 18 व्हॅट क्विक चार्जिंग टेक्नॉलजी वापरण्यात आली आहे.

वाचा : या मोबाईलच्या किंमती आणि फिचर्स बद्दल जाणून घ्या वाचा एका क्लिकवर

हा फोन 4 जीबी-64 जीबी आणि 4 जीबी -128 जीबी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे आणि त्यांची किंमत अनुक्रमे 10,999 आणि 11,999 रुपये

Narzo 20 A 30 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध

सर्वात स्वस्त नारझो 20ए (Narzo 20 A) मध्ये स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर आहे. त्यात 5000 mAh बॅटरी देखील आहे. यात 12 मेगापिक्सलचा ट्रिपल एआय कॅमेरा देखील आहे. हा फोन 3 जीबी -32 जीबी आणि 4 जीबी-64 जीबी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे.

आणि त्यांची किंमत अनुक्रमे 8499 आणि 9499 रुपये आहे. हा फोन 30 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. तिन्ही स्मार्टफोन हे रिअलमी डॉट कॉम, फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोअरवर उपलब्ध असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here