धक्कादायक : कोरोनामुक्त रुग्णाला पुन्हा कोरोना, ‘या’ देशात आढळला रुग्ण!

coronavirus-updates -aurangabad-district -170-cases-covid19-positive
coronavirus-updates -aurangabad-district -170-cases-covid19-positive

हॉगकाँग : कोरोनाच्या थैमानामुळे सर्व देश त्रस्त आहेत. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, लाखो लोकांना कोरोनाच्या संसर्गातून मुक्तताही मिळाली आहे. परंतु कोरोनामुक्त रुग्णाला दुस-यांदा कोरोनाची लागण झाली. ही धक्कादायक घटना हॉगकाँगमध्ये समोर आली.

हॉगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितलं की, “हॉगकाँगमधील एका व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोना झाल्याचं सिद्ध झालं आहे. ही नोंदणीकृत पहिलीच घटना आहे. ३३ वर्षीय आयटी कर्मचाऱ्याला एप्रिलमध्ये कोरोना झाला होता. त्यातून बरं झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. त्या कर्मचाऱ्याला ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातील स्पेनमधून परतल्यानंतर पुन्हा कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोना चाचणी केल्यानंतर हे समोर आलं. असा दावा हॉगकाँग विद्यापीठानं केला आहे.

तज्ज्ञांनी केला होता दावा

कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होत नसल्याचा दावा वारंवार केला जात असतानाच ही घटना समोर आली आहे. तज्ज्ञांनी असं म्हटलं होतं की, कोरोना रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. त्यामुळे पुन्हा संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. वॉशिग्टन विद्यापीठातील व्हायरोलॉजी लॅबमधील सहाय्यक संचालक अलेक्झांडर ग्रेनिंजर आणि फ्रेड हच कॅन्सर संशोधन केंद्राच्या संशोधकांनी ही माहिती दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here