मुंबई : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सदाभाऊ यांनी स्वत: याबाबत फेसबुकवर माहिती दिली आहे. सदाभाऊ खोत यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी होम क्वारंटाईनचा निर्णय घेतला आहे (Sadabhau Khot tested corona positive).
“माझा कोव्हिड 19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मी क्वारंटाईन झालो आहे. मी आता उत्तम आहे. आपणही आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. गणरायाच्या आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन. धन्यवाद”, असं सदाभाऊ खोत फेसबुकवर म्हणाले आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील काही नेते कोरोना पॉझिटिव्ह झाले त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले. परंतु काही नेत्यांवर सध्या उपचार सुरु आहे.