बिग बॉसचं १४वं पर्व येत्या ३ ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे. ऐश्वर्या रायची डुब्लिकेट म्हणून प्रसिद्ध झालेली स्नेहा बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये झळकणार आहे. गेल्या काही काळात ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. परंतु बिग बॉसच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.
बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर स्नेहाने आपला मोर्चा दाक्षिणात्य सिनेसृष्टीकडे वळवला.तिथे सिम्हा, अॅक्शन 3D, वेनम, नेनू मिकू तेलूसा यांसारख्या काही चित्रपटांमध्ये तिने काम केलं.स्नेहा सोबतच करण पटेल आणि राहुल वैद्य याने देखील बिग बॉसची ऑफर स्विकारली आहे.
(सर्व फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)