Surekha Sikri Passes Away l राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या प्रख्यात अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं निधन

surekha-sikri-death-veteran-actress-tv-show-balika-vadhu-passed-away-at-age-75-cardiac-arrest-news-update
surekha-sikri-death-veteran-actress-tv-show-balika-vadhu-passed-away-at-age-75-cardiac-arrest-news-update

मुंबई l प्रख्यात अभिनेत्री आणि टीव्ही मालिकेतील एक मोठं नाव असलेल्या सुरेखा सिक्री Surekha Sikri Passes Away यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या 75 वर्षांच्या होत्या. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या. गेल्या वर्षी त्यांना ब्रेन स्ट्रोकच्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. 

सुरेखा सिक्री यांना त्यांच्या अभिनयासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. ‘बालिका वधु’ सारख्या मालिकेत त्यांची भूमिका आजही लक्षात राहते. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. आयुषमान खुराना प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटातील सुरेखा सिक्री यांची भूमिका विशेष लक्षात राहते.

सुरेखा सिक्री यांना या आधीही 2018 साली पहिल्या ब्रेन स्ट्रोकला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या वर्षी त्यांना दुसरा ब्रेन स्ट्रोक आल्याने त्यांची तब्बेत गुंतागुंतीची झाली होती. त्यामुळे त्यांचं आजारपण बळावलं. आज सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. 

हेही वाचा 

Maharashtra SSC Result 2021 l दहावीचा आज निकाल; कुठे, कसा चेक कराल? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

भाजप पुढाऱ्यांच्या डोक्यातील बटाट्यांना अकलेचे कोंब फुटू नयेत याचंच आश्चर्य वाटतं;शिवसेनेचे टीकास्त्र

मुंबईत मुसळधार पाऊस; मध्य, हार्बर रेल्वेला फटका,रस्ते वाहतुकीवरही परिणाम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here