रामदास आठवले यांना कोरोना,पायल घोषही करणार तपासणी

अभिनेत्री पायल घोष हिने कालच आरपीआयमध्ये घेतला प्रवेश

union-minister- ramdas athawale-tests-covid-positive
union-minister- ramdas athawale-tests-covid-positive

मुंबई l गो कोरोना कोरोना गो अशी घोषणा देणारे आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची बाधा झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. अभिनेत्री पायल घोष हिने कालच आरपीआयमध्ये प्रवेश घेतला होता. आठवलेंच्या संपर्कात आल्यामुळे पायलही कोरोनाची तपासणी करणार आहे.

रामदास आठवले यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी चा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला पाळणार आहे. या दरम्यान माझ्या संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे नोयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

वाचा l भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या : शिवसेना

माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. रामदास आठवले यांना करोनाची लक्षणे नाहीत. कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी काळजी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. 

वाचा l  Cucumber Benefits l काकडीबरोबरच बिया खाण्याचे ११ गुणकारी फायदे

वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खासगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here