Punjab and Uttar Pradesh Voting 2022: पंजाब, उत्तर प्रदेशात आज मतदान

state-election-commission-postpone-nagrarpalika-nagar-panchayat-election-obc-reservation-news-update-today
state-election-commission-postpone-nagrarpalika-nagar-panchayat-election-obc-reservation-news-update-today

नवी दिल्ली: पंजाबमधील सर्व ११७ तर उत्तर प्रदेशातील ५९ जागांसाठी आज, रविवारी मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्याचे मतदान होत असून तेथे मतदानाचे सात टप्पे आहेत.

पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता असून यावेळी त्या पक्षाला आम आदमी पक्षाने आव्हान दिले आहे. त्याचबरोबर अकाली दल-बसप युती तसेच भाजप-पंजाब लोक काँग्रेस आणि अकाली दल (संयुक्त) यांच्या आघाडीत लढत होणार आहे. पंजाबमध्ये दोन कोटी १४ लाख मतदार असून १३०४ उमेदवार रिंगणात आहेत.

 उत्तर प्रदेशातील १६ जिल्ह्यांतील ५९ मतदारसंघांत रविवारी मतदान होत आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तेथेही मतदान होत आहे.

त्यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार केंद्रीयमंत्री एस. पी. सिंह बघेल निवडणूक लढवत आहेत. गेल्या वेळी या ५९ पैकी ४९ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला नऊ जागा जिंकता आल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here