Uttarkashi Tunnel Rescue : उत्तराखंडच्या सिल्क्यारा बोगद्यात 12 नोव्हेंबरपासून 41 मजूर अडकले आहेत. आज 17 वा दिवस आहे, परंतु अद्याप आशेचा किरण दिसत नाही. पुढील २४ तासांत उत्तराखंडमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यांना लवकरच सुखरूप बाहेर काढण्यात येईल, असे अधिकारी सातत्याने सांगत आहेत. मात्र बचाव करताना एकामागून एक समस्या येत असल्याचे वास्तव आहे. पूर्वी ड्रिलिंगसाठी आणलेले अमेरिकन मशीन बिघडले आणि आता खराब हवामान नवीन संकटाचे संकेत देत आहे. आता बोगद्याच्यावरून मॅन्युअल ड्रिलिंग केले जात आहे.
उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे बचावादरम्यान नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. येत्या २४ तासांत राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचण येऊ शकते, अशी शक्यताही शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
कुठपर्यंत पोहोचले काम
मायक्रो टनेलिंग तज्ज्ञ ख्रिस कूपर यांनी सांगितले की, काल रात्री हे काम खूप चांगले झाले. आम्ही 50 मीटर पार केले. आता जवळपास ५० ते ६० मीटर जाणे बाकी आहे. काल रात्री आमच्यापुढे कोणतेही अडथळे नव्हते.
2 मीटर मॅन्युअल ड्रिलिंगचे काम पूर्ण
आज सकाळपासूनची सिल्क्यारा बोगद्याच्या आत मॅन्युअल ड्रिलिंग चालू आहे आणि पाईप्स ढकलण्यासाठी ऑगर मशीनचा वापर केला जात आहे. आतापर्यंत मॅन्युअल ड्रिलिंगचे सुमारे ३०० मीटरचे काम पूर्ण झाले आहे.
बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा आज १७ वा दिवस
उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा आज १७ वा दिवस आहे. आता मॅन्युअल आणि व्हर्टिकल ड्रिलिंग केले जात आहे. मात्र, हवामान हे मोठे आव्हान बनत आहे. IMD ने पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा जारी केला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्तराखंडमधील बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेत निसर्गाचे आव्हान असूनही, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सरकार खंबीरपणे उभे आहे.