भाजपचे ते ‘साडेतीन’ कोण? ईडी सीबीआयला उत्तर ऐकण्याचं राऊतांचं आवाहन

संजय राऊतच या प्रश्नाचं उत्तर आज (मंगळवारी) देणार आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ-दहाच्या सुमारास नाही, तर दुपारी चार वाजता शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) खास पत्रकार परिषद घेत राऊत बॉम्ब फोडणार आहेत.

shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update
shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update

मुंबई : भाजपचे साडेतीन जण पुढील काही दिवसात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि देशमुख बाहेर असतील, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सोमवारी म्हणाले आणि एकच राजकीय धुरळा उडाला. भाजपचे ते ‘साडेतीन’ कोण? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचं उत्तर जाणून घेण्यासाठी फार काळ वाट पहावी लागाणार नाही. कारण खुद्द संजय राऊतच या प्रश्नाचं उत्तर आज (मंगळवारी)  दुपारी चार वाजता शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) खास पत्रकार परिषद घेत राऊत बॉम्ब फोडणार आहेत.

यावेळी शिवसेना बोलणार नसून महाराष्ट्र बोलणार आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) यांचे आरोप, ईडीच्या कारवाईवर पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्र खोटारडेपणाविरोधात लढेल. ही पत्रकार परिषद विरोधकांनी ऐकावी, केंद्रीय तपास यंत्रणांनीही ऐकावी” असं आव्हानही राऊतांनी दिलंय.

आता देशमुख कोठडीबाहेर असतील

जी काही दादागिरी चालली आहे त्याला आम्ही उत्तर देऊ. केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून शिवसेना, ठाकरे परिवारावर जो काही आरोपांचा चिखल उडवला जातोय त्याला आम्ही उत्तर देऊ. हा जेलमध्ये जाईल तो जेलमध्ये जाईल. देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत असेल असं काही सांगितलं जात आहे. पण आता देशमुख कोठडीबाहेर असतील आणि भाजपचे साडेतीन लोकं अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील. आय रिपीट, भाजपचे साडेतीन लोकं लवकरच तुरुंगात असतील, असं संजय राऊत सोमवारी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले.

एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा

महाराष्ट्रातही सरकार आहे. हे लक्षात घ्या. ते शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. सरकार हे सरकार असतं. त्यामुळे ज्यांना आत टाकायचे आहे, त्याचा बंदोबस्त सुरू आहे. हमाम में सब नंगे होते है. एक मर्यादा असते राजकारणात. तुम्ही ती ओलांडली आहे. सर्वांना माहीत आहे मी काय बोलतोय आणि कुणाबद्दल बोलत आहे. माझ्या बोलण्यामुळे त्यांची झोप उडाली आहे. आम्हाला धमक्या देऊ नका. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी तर नाहीच नाही. एजन्सी आणि सरकारला जे उखडायचे ते उखडा, असा इशाराच त्यांनी दिला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here