सुनिल गावसकर म्हणाले,अनुष्काबद्दल मी काय बोललो VIDEO नीट ऐका…

विराट पंजाब विरूद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना घडला प्रकार

sunil-gavaskar-what-exactly-said-in-commentary-video-anushka-sharma-lockdown-virat-kohli-ipl-2020
सुनिल गावसकर म्हणाले,अनुष्काबद्दल मी काय बोललो VIDEO नीट ऐका sunil-gavaskar-what-exactly-said-in-commentary-video-anushka-sharma-lockdown-virat-kohli-ipl-2020

मुंबई : माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil gavaskar)यांनी पंजाब वि. बंगळुरू सामन्यात समालोचन करताना “लॉकडाउन था, तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की इन्होंने”, असं वक्तव्य केलं. त्यांच्या त्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. आता गावसकर म्हणाले स्वत: व्हिडीओ video बघा. मी काय बोललो ते नीट ऐका मग हवं ते खुशाल बोला.

विराट फलंदाजी करत असताना गावसकर यांनी, “लॉकडाउन था, तो सिर्फ अनुष्का के बॉलिंग की प्रॅक्टिस की इन्होंने”, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर काहींनी टीका केली. इतकंच नव्हे तर खुद्द अनुष्कानेदेखील गावसकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

सुनील गावसकर कॉमेंट्री करताना म्हणाले

सुनील गावसकर यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले आक्षेपार्ह टिप्पणी केली नाही

“ज्यांना माझ्या वक्तव्यावर आक्षेप असेल किंवा ज्यांना कोणाला माझं वक्तव्य खटकलं असेल, त्यांनी ती क्लिप नीट ऐका आणि मला सांगा की मी काय चुकीचं बोललो? मी अनुष्काला दोषी ठरवलं नाही. कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणीही केलेली नाही. तुम्ही पुन्हा एकदा तो व्हिडीओ बघा. मी काय बोललो ते नीट ऐका मग हवं ते खुशाल बोला. हेडलाइन्सवर विश्वास ठेवू नका. स्वत: व्हिडीओ बघा. मी माझ्या भूमिकेबाबत साशंक नाही”, असं रोखठोक मत गावसकर यांनी मांडलं.

गावसकरांच्या विधानावर अनुष्काने व्यक्त केली नाराजी

सुनील गावसकर यांच्या उपरोधिक टीकेनं अनुष्का शर्मा नाराज झाली होती. तिने त्यांना सडेतोड उत्तर दिलं. “इतर खेळाडूंच्या कामगिरीसाठी त्यांच्या जोडीदारांना नावं ठेवली जात नाहीत. तशी वागणूक मला केव्हा मिळणार? मी अपेक्षा करते की पुढच्या वेळी तुम्ही विराटच्या खेळीचं वर्णन करताना माझा संदर्भ येऊ देणार नाही”, अशा स्पष्ट शब्दात अनुष्काने गावसकर यांना सुनावलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here