Pradhanmantri fasal Bima Yojana l पीकविमा योजनेला २३ जुलैपर्यंत मुदतवाढ द्या; ठाकरे सरकारचा केंद्राकडे प्रस्ताव

कृषिमंत्री दादाजी भुसे Dada Bhuse यांनी दिली. माहिती

pradhanmantri-fasal-bima-yojana-maharashtra-government-extended-date-of-fasal-bima-dada-bhuse-news-update
pradhanmantri-fasal-bima-yojana-maharashtra-government-extended-date-of-fasal-bima-dada-bhuse-news-update

मुंबई l राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये Pradhanmantri fasal Bima Yojana सहभागी होता यावे यासाठी अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत वाढवून मिळावी अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य शासनाने आज केंद्र शासनाकडे पाठविल्याची Government Extended Date माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे Dada Bhuse यांनी दिली.

पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची आज (१५ जुलै) शेवटची मुदत असून आतापर्यंत सुमारे ४६ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत, असं कृषिमंत्री भुसे यांनी सांगितले. मात्र राज्यातील काही भागात लांबलेला पाऊस, करोना प्रतिबंधासाठी असलेले निर्बंध यामुळे शेतकऱ्यांना मुदतीत विमा हप्ता भरणे शक्य झाले नाही.

त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता यावे यासाठी सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाने २३ जुलै पर्यंत योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा प्रस्ताव आज राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठविला आहे.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सन २०२१-२२ या चालू हंगामासाठी पीकविमा काढण्याची आजची शेवटची मुदत आहे. मात्र गेल्या वर्षी ह्या पीकविम्याच्या बाबतीत प्रचंड गोंधळ झाले होते. तसंच शेतकऱ्यांना वेबसाईट संदर्भातल्या समस्यांसह अनेक तांत्रिक अडचणींनाही सामोरं जावं लागत आहे.

त्यामुळे पीकविम्याला मुदतवाढ द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. याच संदर्भात भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी काल केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची भेट घेतली होती. केंद्र सरकारची मुदतवाढ देण्याची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

दानवे म्हणाले होते, “केंद्र सरकार पीकविम्याला मुदतवाढ देण्यात तयार आहे. मात्र, त्यासाठी राज्याकडून तसा प्रस्ताव यायला हवा. शेतकऱ्यांची विमा भरण्याची इच्छा असूनही पोर्टल बंद पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा भरण्यात अडचणी येत आहेत. अशा अनेक तक्रारी माझ्याकडे आल्यामुळे मी केंद्र सरकारकडे मुदतवाढीची मागणी केली”.

नैसर्गिक आपत्ती, कीड किंवा अन्य रोगांमुळे पिकांचं नुकसान झालं तर त्यासाठी शेतकऱ्याला मदत मिळाली म्हणून २०१६ सालापासून पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेमुळे आत्तापर्यंत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. खरीप हंगाम सुरु होताच दरवर्षी शेतकरी आपल्या पीकांचा विमा काढून घेतात.

हेही वाचा

बिग बीमोठेपणा दाखवा, मनसेची अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर पोस्टरबाजी

महागाईविरोधात छाती बडवणारे नेते आता तोंड उघडायला तयार नाहीत;शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन; आज ७४ व्या वाढदिवशीच घेतला अखेरचा श्वास

                               

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here