कोरोनावर लस शोधून शास्त्रज्ञांनी जीवनदान दिलं, बजेटनं मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं

अर्थसंकल्पावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जोरदार टीका

shashikant-warise-death-case-vinayak-raut-allegation-narayan-rane-close-pandharinath-amberkar-news-update-today
shashikant-warise-death-case-vinayak-raut-allegation-narayan-rane-close-pandharinath-amberkar-news-update-today

मुंबई: कोरोना विषाणूवर लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना केंद्राच्या आजच्या अर्थसंकल्पानं Union Budget 2021 देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे,’ अशी जळजळीत प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी दिली आहे.

मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा कायम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अजित पवार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. ‘दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते करोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांना या बजेटनं निराश केलं आहे. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा कायम आहे.

महिलांसाठी कुठलीही भरीव तरतूद नाही

महिलांसाठी कुठलीही भरीव तरतूद नाही. करदात्यांना कुठलाही दिलासा नाही. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर यावेळीही अन्याय झाला आहे. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

अर्थसंकल्पारखी गोष्ट नशिबावर सोडून चालणार नाही

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांबाबतही अर्थमंत्री बोलल्या. क्रिकेटचा सामना नशिबानं साथ दिल्यास एकवेळ जिंकता येतो, परंतु देशाच्या अर्थसंकल्पारखी गोष्ट नशिबावर सोडून चालणार नाही, हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी समजून घ्यायला हवं होतं. केंद्रीय अर्थसंकल्प हे आत्मनिर्भर बजेट असल्याचा ट्रेंड ट्विटरवर चालवला जातोय, परंतु हे आत्मनिर्भर नव्हे तर देशाला बरबादीकडे नेणारं अस्ताव्यस्त बजेट असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

हेही वाचा: Budget 2021: अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा; जाणून घ्या एका क्लिकवर

हेही वाचा: म्यानमारमध्ये जबरदस्ती सत्ता ताब्यात घेणाऱ्या लष्कराला अमेरिकेने दिला हाइशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here