CMO कडून औरंगाबाद शहराचा संभाजीनगर असा उल्लेख, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात संतापले

सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध

cmo-mention-aurangabad-as-sambhajinagar-congress president-balasaheb-thorat-expressed-displeasure
cmo-mention-aurangabad-as-sambhajinagar-congress president-balasaheb-thorat-expressed-displeasure

मुंबई: औरंगाबाद Aurangabad शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या CMO अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन बुधवारी संभाजीनगर Sambhaji nagar असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात Balasaheb thorat यांनी नाराजी व्यक्त केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे, अशा शब्दांत खडसावले.

शिवसेना कित्येक वर्षापासून संभाजीनगर या नावाभोवती राजकारण करत आहेत. महापालिका,लोकसभा,विधानसभा निवडणुकांमध्ये हयाच मुद्याभोवती राजकारण तापवलं जातं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचा संभाजीनगर नामकरणाला विरोध असल्याची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे.

भाजप आणि मनसेकडून शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवला आहे. अशात मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन काँग्रेस नेते वैद्यकीय शिक्षण,सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या पोस्टमध्ये संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली.

थोरात म्हणाले,माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने परस्पर नामांतर करू नये

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतर करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतर करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असे म्हणत महाविकास आघाडी करताना ठरवलेल्या समान कार्यक्रमाची आठवण करून दिली.

यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वापर करुन राजकारण खेळू नये

छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

हेही वाचा : औरंगाबादचे नाव बदलण्यास काँग्रेसचा ठाम विरोध: बाळासाहेब थोरात

हेही वाचा:औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढे राहिल : अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here