औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील : अशोक चव्हाण

congress-will-continue-to-oppose-the-renaming-of-aurangabad-says-congress minister ashok-chavan
congress-will-continue-to-oppose-the-renaming-of-aurangabad-says-congress minister ashok-chavan

जालना : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच नामांतरावरून वादळ उठलं आहे. औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेना Shivsena आणि काँग्रेस Congress या दोन पक्षांत नुरा कुस्ती चालली आहे असा टोला माजी मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis यांनी लगावला होता. त्यानंतर काँग्रेस Congress leader नेते माजी मुख्यमंत्री Ex cm तथा बांधकाम मंत्री अशोक चव्हाण Ashok chavan यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. औरंगाबादच्या नामांतरास आमचा विरोध होता आणि यापुढेही राहील. 

औरंगाबादचे नामांतर हा महाविकास आघाडी सरकारच्या समान किमान कार्यक्रमाचा भाग नाही. औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, असंही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : औरंगाबादचे संभाजीनगर करून तुम्ही का मोकळे झाला नाहीत?;शिवसेनेचा भाजपला सवाल

बाळासाहेब थोरात म्हणाले होते…

‘शहरांची नावं बदलली म्हणून विकासाचे प्रश्न सुटत नाहीत. काँग्रेस पक्षाचा भर जनतेचे प्रश्न सोडवण्यावर तसेच विकासाची काम करण्यावर आहे. औरंगाबादचे नाव बदलण्याचा विषय अद्याप चर्चेसाठी आलेला नाही.

हेही वाचा : औरंगाबादचे नाव बदलण्यास काँग्रेसचा ठाम विरोध!;बाळासाहेब थोरात

ज्यावेळी समन्वय समितीमध्ये हा विषय चर्चेला येईल तेव्हा काँग्रेस आपली भूमिका मांडेल परंतु, नाव बदलण्यास काँग्रेस पक्षाचा ठाम विरोध आहे’, असे बाळासाहेब थोरात यांनी नमूद केले होते.

हेही वाचा : तेव्हा शिवसेना गोट्या खेळत होती का? भाजपाचा शिवसेनेला सवाल

राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आले आहे. हे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. यात शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा नाही. घटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेवर आलो आहोत. त्या घटनेतील तत्वाला बाधा येईल असा निर्णय घेतला जाणार नाही, असेही थोरात म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here