डॉन अरुण गवळीची प्रकृती चिंताजनक; उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले

कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रकृती खालावली

Arun Gawali corona positive admitted atTrauma care center
Arun Gawali corona positive admitted atTrauma care center

नागपूर: कुख्यात गुंड अरुण गवळीची प्रकृती खालावली आहे. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीला Arun Gawali काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून अरूण गवळीची प्रकृती सातत्याने खालावत आहे. सध्या गवळीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यामुळे अरुण गवळीला आता उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये Trauma care center हलवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी अरूण गवळीची प्रकृती खराब झाली होती. तेव्हा तुरुंग अधिकाऱ्यांनी गवळी व इतर कैद्यांची कोरोना चाचणी करवून घेतली. त्यामध्ये अरूण गवळीसह पाच कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तुरुंग प्रशासनाने अरूण गवळीसह कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना वेगळ्या बॅरेकमध्ये ठेवले.

गेल्या चार दिवसांपासून अरूण गवळी याच्यावर तुरुंगातील रुग्णालयातच उपचार सुरु आहेत. गवळीला दिवसातून तीन वेळा काढा, गरम पाणी व औषधे दिली जात होती. परंतु, या उपचारांचा विशेष फायदा झाला नाही.

अखेर आज सकाळी प्रकृती प्रचंड खालावल्याने गवळीला मेडिकलमधील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. सध्या याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव अरूण गवळीवर मेडिकल का कारागृहातील रुग्णालयातच पुढील उपचार करावे, याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

अरुण गवळीच्या पॅरोल आणि फर्लो रजा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यात अरुण गवळीला 28 दिवसांची फर्लो रजा मंजूर केली होती. त्याच्या काही दिवस आधीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करुन नागपूर कारागृहात परतला होता. अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला आहे.

पत्नी गंभीर आजारी असल्याच्या कारणास्तव न्यायालयाने सुरुवातीला अरुण गवळीला 45 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. यानुसार, त्याला 27 एप्रिलपर्यंत आत्मसमर्पण करायचे होते. मात्र, लॉकडाऊनमुळे नागपूरला परत येणे शक्य होत नसल्याचे कारण देत अरुण गवळी याने न्यायालयात पॅरोल वाढवण्यासाठी अर्ज दिला होता. यानंतर न्यायालयाने तो अर्ज मंजूर केला. त्यामुळे अरुण गवळीला कारागृहात हजर होण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ मिळाली होती.

हेही वाचा: 

IPL 2021 Auction: 292 खिलाड़ियों की फाइनल लिस्ट जारी, देखें पूरी लिस्ट

पडळकरांकडून शरद पवारांवर टीकास्त्र; जेजुरी गडावर पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या पुतळा अनावरणावरुन राडा

Royal Enfield Himalayan 2021 भारतीय बाजार में लॉन्च,जानिए कीमत और नए फीचर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here