Cyber attack l मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवेळी सायबर हल्ला

maharashtra-college-reopen-to-start-academic-year-after-diwali-said-minister-uday-samant-news-update
maharashtra-college-reopen-to-start-academic-year-after-diwali-said-minister-uday-samant-news-update

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेच्या वेळी सर्व्हर डाउन नव्हता तर नियोजनबद्ध सायबर हल्ला Cyber attack करण्यात आला होता असा आरोप उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापुरात केला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेवेळी सर्व्हर डाऊन झाला नव्हता. तर तो सायबर हल्ला Cyber attack होता असा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. याबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू झाली आहे,अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम परीक्षा ऑनलाईन होत असतानासर्व्हर मध्ये बिघाड झाल्याचे समोर आले होते. या मुद्याकडे लक्ष वेधल्यावर मंत्री सामंत यांनी सांगितले की,’ याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू आणि सायबर विभाग प्रमुख रश्‍मी करंदीकर यांच्याशी चर्चा झाली आहे.

वाचा : MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची घोषणा

कुलगुरूंनी दिलेल्या प्राथमिक अहवालामध्ये सायबर प्रणाली उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता असे नमूद केले आहे. हा सायबर हल्ला Cyber attack आहे. याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली असून कालपासून त्याची चौकशी सुरू झाली आहे.

परीक्षा हजार विद्यार्थी मात्र एकाच वेळी अडीच लाख विद्यार्थ्यांकडून लिंक ओपन

ऑनलाइन शिक्षणाचा कसलाही गोंधळ नाही. काहीजण मुद्दाम घोळ घालत आहेत. ही ऑनलाईन परीक्षा ९ हजार विद्यार्थी देत होते. मात्र एकाच वेळी अडीच लाख विद्यार्थ्यांकडून त्याची लिंक ओपन केली जात असल्याचे समोर आले. ही यंत्रणा ठप्प होण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला हा प्रयत्न आहे. तपासातून सर्व सत्य पुढे येईल, असेही सामंत यांनी नमूद केले.

वाचा : RBI l अर्थव्यवस्था ९.५ टक्क्यांनी घसरणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here