जोधपूर l UPSC परीक्षेत २०१५ साली देशातून अव्वल आलेल्या टिना डाबी Tina dabi आणि त्याच वर्षात दुसरा क्रमांक पटकावलेला तिचा पती अथर खान Athar khan विभक्त होणार आहे. दोघांनीही परस्परांच्या संमतीने जोधपूर कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. २०१८ साली टिना डाबी आणि अथर खान विवाहबंधनात अडकले होते.
राजस्थान कॅडरच्या आयएस अधिकारी असलेल्या टिना आणि अथर खान हे आपल्या ट्रेनिंगदरम्यान एकत्र आले. दोघांच्याही मैत्रीचं रुपांत प्रेमात झालं आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. टिना आणि अथर यांचं लग्न हे काही वर्षांपूर्वी चर्चेचा विषय ठरलं होतं. लग्नानंतर काही दिवसांमध्येच टिनाने आपल्या सोशल मीडिया प्रोफाईलवरुन खान हे आडनाव काढून टाकलं आणि चर्चांना उधाण आलं.
हेही वाचा l Coronavirus Updates l महाराष्ट्रात आढळले ५ हजार ६४० कोरोना रुग्ण,१५५ जणांचा मृत्यू
अथरनेही काही दिवसांनी टिनाला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्यानंतर चर्चांचं अधिकच पेव फुटलं होतं. टिना आणि अथर यांचं लग्न भारतात राजकीय मुद्दाही बनला होता. हिंदु महासभेने टिना आणि अथर यांचा विवाह लव जिहाद ठरवत टीका केली होती. यानंतर दोघांमध्ये पटत नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. अखेरीस दोघांनीही घटस्फोटासाठी अर्ज दाखल करत आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा l बापरे! उस्मानाबादेत 48 शिक्षक आढळले कोरोना पॉझिटिव्ह