कंगनाच्या मदतीला मोदी धावले, केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा

kangana-ranaut- Granted-Y-security – provide –to- central government
kangana-ranaut- Granted-Y-security – provide –to- central government

मुंबई : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना रनौतच्या मदतीला केंद्र सरकार धावून आलंय (Y grade security to Kangana Ranaut). केंद्र सरकारने कंगना रनौतला Y दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारनेही कंगनाला सुरक्षा पुरवण्याचे आधीच जाहीर केले होते.

मुंबई आणि मुंबई पोलिसांवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर शिवसेनेसह महाराष्ट्रातील अनेक पक्षांनी कंगनावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी तर कंगनाला मुंबईत आल्यानंतर धडा शिकवण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं होतं. केंद्राच्या या निर्णयानंतर कंगना रनौतने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जाहीर आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here