मुंबई : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी देशभरातून केंद्र तसेच उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात संतापाची लाट आहे. महाराष्ट्रातदेखील काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केलाय. आशिष मिश्रा यांचे वडील केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली आहे. या मागणीला घेऊन नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वात सोमवारी राजभवनावर मैनव्रत आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनाविषयी बोलताना “आमच्या दबावामुळे नाईलाजाने आशिष मिश्राला अटक करण्यात आली. आशिष मिश्राच्या वडिलांनी राजिनामा घ्यावा. त्यासाठी आम्ही उद्या (11 ऑक्टोबर) राजभवनासमोर आंदोलन करणार आहोत,” अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
आशिष मिश्राच्या वडिलांचा राजीनामा घ्यावा
“आमच्या नेत्यांनी पूर्ण देशभर विरोध केला आणि दबाव वाढवला. आमच्या दबावामुळे नाईलाजाने आशिष मिश्राला अटक करण्यात आली. मात्र त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होवू नयेत यासाठी प्रयत्न केला जातोय. आशिष मिश्राच्या वडिलांचा राजीनामा घ्यावा. उद्या आम्ही राजभवनाबाहेर आंदोलन करणार आहोत,” असे नाना पटोल म्हणाले आहेत.
आशिष मिश्रा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी अखेर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांना अटक करण्यात आलं आहे. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. सध्या न्यायालयाने मिश्रा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांना शनिवारी (9 ऑक्टोबर) सकाळी ताब्यात घेण्यात आलं होतं.
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना तातडीने आपल्या पदावरुन हटवावे या मागणीसाठी काँग्रेसने आपल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुखांना सोमवारी तीन तास मौन पाळण्यास सांगितले आहे. हे मौन आंदोलन सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयाबाहेर पाळले जाणार आहे.
पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी लखीमपूर खेरीला पोहोचताच शुक्रवारी रात्रीपासून ‘मौन’ ठेवले होते. आशिष मिश्रा शनिवारी पोलिसांकडे चौकशीसाठी गेल्यानंतर त्यांनी मौन आंदोलन मागे घेतले.
काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रदेश काँग्रेस समित्यांना पाठवलेल्या पत्रानुसार, ११ ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने राजभवन किंवा केंद्र सरकारच्या कार्यालयासमोर सर्व राज्य मुख्यालयात सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत पर्यंत ‘मूक आंदोलन’ केले जाईल.
काँग्रेस आता लखीमपूर खेरी हिंसाचारावर देशव्यापी आंदोलन आयोजित करण्याच्या तयारीत आहे. लखीमपूर खेरी हिंसाचारात मारले गेलेले पत्रकार रमण कश्यप यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी शुक्रवारी मौन व्रत सुरु केले होते आहेत. जिल्ह्यातील निघासन येथील दिवंगत पत्रकाराच्या घरी भेट दिल्यानंतर सिद्धू म्हणाले की, जोपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे मूक आंदोलन सुरू राहील.
हेही वाचा: Maharahstra Bandh : सोमवारच्या’महाराष्ट्र बंद’ला मुंबईच्या डबेवाल्यांचा पाठिंबा!