Mushroom Health Benefits l मशरूम खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?

Mushroom Health Benefits for Your Skin, Brain, and Bones
Mushroom Health Benefits for Your Skin, Brain, and Bones

मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. त्यामुळे मशरुम खाणं खूप गरजेचं आहे. मशरुम करी, सलाड, सूप आणि भाजी बनवूनही खाता येतं. इतकंच नाही, तर मशरूम स्नॅक्स म्हणूनही खाता येतात. विशेष म्हणजे मशरूम अनेक आजारांवर एखाद्या औषधापेक्षा कमी नाही. जाणून घेऊयात मशरूमचे आरोग्यदायी फायदे.Mushroom Health Benefits for Your Skin, Brain, and Bones

>> मशरुममध्ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. शरीरात व्हिटॅमिनची भरपूर आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, बी 12 यांची शरीरात योग्य प्रमाणात गरज असते. प्रत्येक व्हिटॅमिनचं आपलं वेगळं वेगळं कार्य असतं ते कार्य सुरळीत ठेवण्यासाठी शरीरात सगळ्या व्हिटॅमिनची गरज असते. मशरुममध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे मशरुम खाणं खुप आवश्यक आहे.

>>पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. तसेच मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंटही असून यामुळे शरीरातील वाढत्या वयाच्या लक्षणं दिसत नाहीत. मशरूममध्ये कोलीन नावाचं एक खास पोषक तत्त्व आढळतं. जे स्नायूंची सक्रियता आणि स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी मदत करते.

>> सूप किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपात तुम्ही मशरूम खाऊ शकता. मशरुमच्या अनेक रेसिपी इंटरनेटवर उपलब्ध आहेत. मशरुम बाकी अऩेक पदार्थ आपल्याला माहित असतं. ते ही करुन खा म्हणजे कोणत्याही रित्या शरिरात मशरुममधील जिवनसत्व जाईल.

>> मशरूममध्ये कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. त्यामुळे आरोग्य चांगलं राहू शकतं. म्हणुन रो़जच्या जेवणात थोडं तरी मशरुम खाणं गरजेचं आहे.

>> सध्या लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चालल्यामुळं कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात खुप वाढ आहे. मधूमेहाच्या लोकांना कोलेस्टेरॉलचा खुप त्रास होतो. मधुमेहाचं प्रमाण वाढलं तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढतं आहेय. त्यामुळं मधुमेह असलेल्या लोकांनी मशरुम खा.

>> मशरुममुळं अनेक आजार दूर करण्याची ताकद आहे. अनेक गोष्टींवर मात करण्यासाठी मशरुम उपयुक्त आहे. रोज नाही तर हफ्त्यातून एक दिवस मशरुम खा. आरोग्यदायी ठरेल.

>> मशरुम कॅन्सरच्या पेशींवर आळा घालण्यासाठीही मशरूम उपयुक्त ठरते. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की, मशरूम खाल्यानं कॅन्सरपासून शरीराचा बचाव होतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here