मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वाढत्या महागाई विरोधात गुरुवारी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nationalist Youth Congress state president) महेबूब शेख (Mahebub Shaikh) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे. यासाठी राज्यभर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिका-यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
देशभरात महागाईमुळे जनता त्रस्त झालेली आहे. राज्यात महागाई, आरोग्य, रोजगार, शेतक-यांच्या प्रश्नांकडे शिंदे सरकारने दुर्लक्ष केले आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा. प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळावा. महागाई कमी व्हावी. बळीराजाला नुकसाना भरपाई मिळावी. या सर्व मागण्यांकडे सरकारचे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व प्रदेश पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांनी केले आहे.
५० खोके महागाई एकदम OK
जनता भरते जीएसटी, गद्दार जातात गुवाहाटी..!
महागाई कशासाठी, आमदारांच्या खरेदीसाठी…
महागाईने दुखते, डोके, गद्दारांना ५० खोके… ५० खोके…!
बहुत हो गयी महंगाई की मार, चलो हटाये मोदी सरकार…!
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nationalist Youth Congress state president) महेबूब शेख (Mahebub Shaikh) हे औरंगाबादेत आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून मिळाली आहे.