राज्यपालांची हकालपट्टी करा; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक!

राज्यपालांच्या विधानाच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘राज्यपाल हटाओ… महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन

ncps-agitation-in-pune-to-protest-against-governors-statement-news-update-news-update-today
ncps-agitation-in-pune-to-protest-against-governors-statement-news-update-news-update-today

मुंबई: मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh koshyari) यांनी केले होते. राज्यपाल भगतिसंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात असताना. आज (शनिवार) पुण्यातील अलका चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल हाटाओ… महाराष्ट्र बचाओ, असं आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या देखील उपस्थित होत्या. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

“ज्या महाराष्ट्रामध्ये राहता, तेथील खाता आणि त्याच भूमीचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अपमान केला जातो. यापुर्वी देखील महापुरुषांचा अपमान केला. यातून दोन समाज आणि राज्यांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम त्यांनी केले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध व्यक्त करतो. आता महाराष्ट्राच्या राज्यपालांची हकालपट्टी करा, अशी मागणी राष्ट्रपतींकडे करणार आहे.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी सांगितले.

त्यांच्या डोक्यावर काठी मारण्याची गरज – रूपाली पाटील

आपल्या मराठीत एक म्हण आहे. साठी बुद्धी नाठी.. असं त्यांचं झालेल आहे. पण सर्वांचीच झालेली नसून भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानावरून तरी त्यांची झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर काठी मारण्याची गरज आहे. यापुर्वी देखील आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल वादग्रस्त विधानं करण्याची हिंमत होतीच कशी? असा सवाल रुपाली पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

आता म्हणतात विपर्यास केला, तर हे कसं शक्य आहे. ते जाणून बुजून करीत आहेत. त्यामुळे राज्यपाल पदावरून भगतसिंह कोश्यारींनी पायउतार व्हावे. ज्या व्यक्तीला महाराष्ट्राच वैभव, संस्कृती माहिती आहे, अशा व्यक्तीला भाजपाने राज्यपाल पदावर नियुक्त करावे. या कृतीला भाजपाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे सांगत त्यांनी भगतसिंह कोश्यारी आणि भाजपावर टीका केली.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here