मराठवाडा शिक्षक मतदारसंघ : राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपमध्ये बंडखोरी, राष्ट्रवादीतून प्रदीप सोळुंकेंची हकालपट्टी!

१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

ncp-chief-sharad-pawar-first-reaction-on-maharashtra-political-crisis-news-update-today
ncp-chief-sharad-pawar-first-reaction-on-maharashtra-political-crisis-news-update-today

औरंगाबाद :औरंगाबाद विभाग मराठवाडा शिक्षक मतदारसंघात निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विद्यमान आ.विक्रम काळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी वक्ता सेलेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी बंड पुकारल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.Teacher constituency Aurangabad news marathi

मराठवाडा शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी वक्ता सेलेचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप साळुंके हे इच्छुक होते. पक्षाकडून विद्यमान उमेदवार विक्रम काळे यांना चौथ्यांदा उमेदवारी देण्यात आली. सोळुंकेंनी सुध्दा अर्ज भरल्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. साळुंके यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विक्रम काळे यांनी त्यांची मनधरणी केली होती परंतु त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. मात्र, सोळुंके आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे विक्रम काळे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमधून भाजपात गेलेले प्रा. किरण पाटील हे भाजपचे अधिकृत उमेदवार असताना भाजपचे प्रा.मनोज पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षात बंडखोरी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी १५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी दुपारी तीनवाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती. मराठवाडा विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला असून १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली.

१४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…काळे विक्रम वसंतराव – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रा.पाटील किरण नारायणराव – भारतीय जनता पार्टी, माने कालीदास शामराव – वंचित बहुजन आघाडी, अनिकेत भीमराव वाघचवरे पाटील – अपक्ष, प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (के.सागर) – अपक्ष, आशिष (आण्णा) आशोक देशमुख – अपक्ष, कादरी शाहेद अब्दुल गफुर – अपक्ष,नितीन रामराव कुलकर्णी – अपक्ष, प्रदीप दादा सोळुंके – अपक्ष, मनोज शिवाजीराव पाटील – अपक्ष, विशाल (विक्की) उद्धव नांदरकर – अपक्ष, सुर्यकांत संग्राम विश्वासराव – अपक्ष, संजय विठ्ठलराव तायडे – अपक्ष, ज्ञानोबा चिमनाजी डुकरे – अपक्ष असे एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here