‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवाल लग्नाच्या बेडीत अडकणार

बिझनेसमन गौतम किचलूसोबत 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत लग्न

singham-fame-actress-kajal-agarwal-to-tie-the-knot-on-october-30-with-businessman-gautam-kichlu
singham-fame-actress-kajal-agarwal-to-tie-the-knot-on-october-30-with-businessman-gautam-kichlu

प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (singham-fame-actress-kajal-agarwal ) 30 ऑक्टोबर रोजी बोहल्यावर चढणार आहे. तिने आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. गौतम किचलूबरोबर (gautam-kichlu) मुंबईत एका छोटेखानी समारंभात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे काजलने सांगितले आहे.

हिंदी, तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काजल काम करते. काजल सिंघम, स्पेशल 26, मगधीरा अशा चित्रपटांमध्ये दिसली आहे. आपल्या पोस्टमध्ये काजलने लिहिले, ’30 ऑक्टोबर 2020 रोजी मी गौतम किचलूसोबत मुंबईत लग्न करणार आहे. या खासगी आणि छोटेखानी सोहळ्यात फक्त आमच्या कुटुंबातील सदस्यच सहभागी होतील.’

पाहा : बिग बॉस स्पर्धक निक्की तांबोळीचा ग्लॅमरस लूक click करा

लग्नाची घोषणा करण्यापूर्वी काजल या पोस्टमुळे चर्चेत आली होती. रिपोर्ट्सनुसार गेल्या महिन्यात या दोघांचा साखरपुडा झाला होता.

गौतम किचलू कोण आहे ?

रिपोर्ट्सनुसार, गौतम किचलू हा एक व्यवसायिक आहे. इंटेरिअर डिझाईन आणि होम डेकोरशी संबंधित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘डिसर्न लिव्हिंग’चा मालक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here